शासकीय
जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार गोपाळ साळुंखे यांनी स्वीकारला
0
3
2
1
2
3
नाशिक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक येथील माहिती अधिकारी म्हणून गोपाळ साळुंखे यांनी दि २७ मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. नुकतीच सांगली येथे बदली झालेल्या जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्याकडून नाशिक जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.
यानिमित्त जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती बीडकर यांच्यासह येथून बदली झालेल्या माहिती अधिकारी अर्चना देशमुख, सहाय्यक संचालक मोहिनी राणे यांना निरोप देण्यात आला. तर मंत्रालय, मुंबई येथून नाशिक विभागीय माहिती कार्यालयात सहाय्यक संचालक पदावर आलेले दीपक चव्हाण यांचे एका छोटेखानी कार्यक्रमात स्वागत करण्यात आले.
यावेळी विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0
3
2
1
2
3