Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक

प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी क्लिनिकची सुरुवात

0 3 2 1 2 1

मणिपाल हॉस्पिटल बाणेर तर्फे कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी क्लिनिकची सुरुवात

नाशिक: कॅन्सरचा प्रतिबंध आणि लवकर निदान करण्याच्या दिशेने एक वेगवान पाऊल टाकत, बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल तर्फे जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी क्लिनिक ची सुरुवात केली आहे. या क्लिनिक च्या माध्यमातून लोकांना आता वेळेत स्क्रीनिंग, जीवनशैली विषयी मार्गदर्शन आणि धोक्याची गणना करुन लवकरच्या टप्प्यातील सुधारीत उपचार प्राप्त होऊ शकणार आहेत. या वर्षीचा विषय ‘युनायटेड बाय युनिक’ ला अनुसरुन या उपक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक, तंत्रज्ञानावर आधारीत उपचार हे प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार तयार करण्यात येणार आहेत.

या क्लिनिकचे उद्घाटन डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यांनी कॅन्सर रुग्णांच्या प्रवासातील कॅन्सरच्या लवकर निदानाचे महत्त्व आधोरेखित केले. त्यांच्या सह डॉ. अमीत पारसनीस, डॉ. लखन कश्यप आणि डॉ. करण चंचलानी यांनी अत्याधुनिक निदान पध्दती आणि प्रतिबंधात्मक योजनां बद्दलची माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध पाहूणे, रुग्ण आणि काळजी वाहम उपस्थित होते, यामुळे मणिपाल हॉस्पिटलच्या समाजाप्रती कॅन्सरवरील उपचार सहज आणि प्रतिबंधात्मक पध्दतीने उपलब्ध करुन देण्याची वचनबध्दता अधोरेखित होते.

या सुरुवाती विषयी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल्स चे क्लस्टर डायरेक्टर श्री. आनंद मोटे यांनी सांगितले “ कॅन्सर चा प्रतिबंध करण्याचा प्रवास हा योग्य ज्ञान आणि वेळेत उपचार केल्याने सुरु होतो. या क्लिनिक मुळे आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या धोक्या विषयी सांगून जीवनशैलीतील योग्य बदल समजावून त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी संरचनात्मक पाऊले उचलण्यावर भर देणार आहोत.”

मणिपाल हॉस्पिटल्स विषयी

आरोग्य क्षेत्रातील एक आघाडीचे असलेले मणिपाल हॉस्पिटल्स हे भारतातील सर्वांत मोठ्या हॉस्पिटल नेटवर्क्स पैकी एक असून ते वर्षाला ७ दशलक्षां हून अधिक रूग्णांना सेवा प्रदान करतात. परवडणार्‍या दरात, उच्च गुणवत्तेची आरोग्य सेवा मल्टी स्पेशॅलिटी आणि टर्शरी केअर देण्याच्या क्षेत्रासह ते आऊट ऑफ हॉस्पिटल केअर क्षेत्रातही कार्यरत आहे. भारतातील मडिका सिनर्जी हॉस्पिटल्स आणि एएमआरआय हॉस्पिटल्स लिमिटेड (सप्टेंबर २०२३ मध्ये अधिग्रहण) चे अधिग्रहण केल्यानंतर आजमितीस संपूर्ण भारतात मणिपाल हॉस्पिटल्स कडून १९ शहरांतील ३७ हॉस्पिटल्स च्या माध्यमातून १०,५०० हून अधिक खाटांचे व्यवस्थापन, ५,६०० हून अधिक कुशल डॉक्टर्स आणि १८,६००हून अधिक कर्मचारी यांचे नेटवर्क निर्माण झाले आहे.

 

मणिपाल हॉस्पिटल्स हे नेहमीच जगभरांतील रुग्णांना उच्च गुणवत्तेचे आरोग्य सुविधा देणारे हे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल ठरले आहे. मणिपाल हॉस्पिटल्सचे उपचार हे एनएबीएच, एएएचआरपीपी मान्यताप्राप्त असून त्यांच्या नेटवर्क मधील अधिकतर हॉस्पिटल्स ही एनएबीएल, ईआर प्रमाणन हे त्यांच्या ब्लड बँकांना प्राप्त आहेत. हे सर्वोत्कृष्ट आरोग्य सुविधांसाठी ओळखले जाते. मणिपाल हॉस्पिटल्स हे प्रतिथयश आणि रूग्णांकडून तसेच भारतातील अनेक ग्राहक सर्वेक्षणातून सर्वाधिक रेटिंग मिळालेले हॉस्पिटल ठरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे