
0
3
2
1
2
3
कर्नाटक राज्यातील महाराष्ट्राच्या एसटी बस फेऱ्या रद्द
नाशिक –
कन्नड वेदिका रक्षक या संघटनेने महाराष्ट्रातील एसटीचे महाराष्ट्रीयन चालकांना वाहकांना तोंडाला काळे फासून मराठी भाषेचा निषेध केला आहे त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक येथे त्यांच्या कर्नाटक परीवहनच्या बसेसला काळे फासले तसेच बसेसवर ‘जय महाराष्ट्र, मनसे नासिक’ असो लिहून इशारा देण्यात आला. तसेच यातील वाहक मराठी असल्याने त्यांचा सन्मान करून त्यांना परत पाठवण्यात आले आहे. मनसेच्या वतीने यापूर्वीही अशाच प्रकारे कर्नाटकाने महाराष्ट्रातील मराठी भाषिकांवर अन्याय केल्यावर आंदोलन करण्यात आले हेाते. आताही ठक्कर बाजार बस स्थानक येथे आंदेालन करण्यात आले.
याप्रसंगी शहराध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आदी यांनी कर्नाटकचा निषेध करून बसला काळे फासले आणि कन्नड सरकारचा निषेध करून यापुढेही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा दिला आहे.
कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे कन्नड वेदिका रक्षक संघटनेने महाराष्ट्रातील एसटीचालक व वाहकांच्या तोंडाला काळे फासत मराठीजनांचा अवमान केला होता. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.२२) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिक शहरात आलेल्या कर्नाटकच्या बसवर ‘जय महाराष्ट्र, मनसे नाशिक’ असे लिहिले. या बसचे चालक महाराष्ट्रीयन असल्याने त्यांचा सत्कार करत त्यांना सन्मानाने परत पाठवण्यात आले. या आंदोलनाप्रसंगी मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, उपशहराध्यक्ष मिलिंद कांबळे, राकेश परदेशी, अमित गांगुर्डे, शहर सचिव नितीन आहेरराव, वाहतूक सेना चिटणीस जनार्दन खाडे, सचिव बबलू ठाकूर यांनी घोषणा देत कर्नाटकचा निषेध केला. तसेच, कन्नड सरकारचा निषेध करत आगामी काळात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.
कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो. तथापि, प्रवासी व आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) श्री. विवेक भीमनवार यांना दिले आहेत. दरम्यान परिवहन मंत्री श्री .सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेले चालक श्री.भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. तसेच ” या प्रकरणात तुम्ही एकटे नसून, आपले सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे.” अशी ग्वाही देखील दिली. तसेच कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाची चर्चा करत नाही तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील. असे निर्देश देखील त्यांनी एसटी महामंडळाला यावेळी दिले.

रात्री दि.२१/०२/२०२५ रोजी ठिक २१.१० वाजता मुंबई आगाराची बस बंगळुरू -मुंबई येत असताना (बस क्रमांकMH14 K Q 7714) ही बस चित्रदुर्ग च्या पाठीमागे दोन किलोमीटर आली असता ,तथाकथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्ते यांनी गाडी थांबवून बस व चालकाला काळे फासले . तसेच कर्तव्यावर असणाऱ्या चालक श्री. भास्कर जाधव यांना मारहाण देखील करण्यात आली. (दोघेही कोल्हापूर आगारात कार्यरत आहेत.) त्यानंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आहे. आज सकाळी विभाग नियंत्रक कोल्हापूर यांनी बस व चालक – वाहक यांना सुखरूप कोल्हापूर येथे आणले. तथापि, सीमावर्ती भागातील तणाव लक्षात घेता, परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. असे एसटी महामंडळ कडून कळवण्यात आले आहे.
0
3
2
1
2
3