शरद लोहकरे, लासलगाव….
पेठ तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या महिलेचा नांदगाव ता.निफाड येथील विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
म्हसगण ता.पेठ येथील काही मजूर कामानिमित्त नांदगाव ता.निफाड येथे आले आहेत. त्यातील कुसुम हिरामण शिंगरे, वय ४० या दि.२२ डिसें. रोजी पहाटे ५ वा.चे सुमारास मी बाथरुमला जाते असे सांगुन गेली. पंरतु, ती बराच वेळ होऊनही आली नाही. त्यामुळे तिचा आजूबाजूला शोध घेतला असता तिचा मृतदेह शरद नवले यांच्या विहिरीत आढळून आला. अधिक उपचारार्थ तिला निफाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केलेबाबतचे खबरीवरुन लासलगाव पोलीस ठाण्यात अ.मृ.र.नंबर ६५/२०२४ भारतीय नागरी सुरक्षा कायदा १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.बी.बी.कांदळकर करीत आहेत. महिलेच्या कुटुंबियांचा घातपाताचा संशय असून, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तिची हत्या की आत्महत्या? याचा पोलिसांनी सखोल तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यलगार कष्टकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.