Breaking
शासकीय

*भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे उदघाटन*

0 1 5 1 2 1

*भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे उदघाटन*

  1. नाशिक, दि.1 जुलै 24 

भारतीय लष्कराच्या नाशिक इथल्या तोफखाना केंद्रातील नूतनीकरण केलेल्या कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे आज उदघाटन झाले. 

देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांच्या जयंतीनिमीत्त आज या नुतनीकरण झालेल्या तोफखाना संग्रहालयाचा भव्य उद्घाटन समारंभ झाला. कुमारमंगलम तोफखाना संग्रहालय असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांचे पुत्र सुबरायण बेहराम आणि त्यांची कन्या पार्वती या उद्घाटन समारंभाला उपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच स्कुल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट आणि रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे वरिष्ठ कर्नल कमांडट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर (अतिविशिष्ट सेवा पदक**), आर्टिलरी महासंचालक आणि ग्रूप – VI चे कर्नल कमांडट लेफ्टनंट जनरल अदोष कुमार (अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक) यांच्यासह माजी सैनिक तसेच इतर मान्यवरही या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावे साकारण्यात आलेले तोफखाना संग्रहालय हे देशातील अशाप्रकारचे एकमेवद्वितीय संग्रहालय आहे. या सग्रहालयाच्या माध्यमातून देशाच्या तोफखान्याचा समृद्ध इतिहास आणि तोफखान्याचे महत्त्वपूर्ण योगदानाचे मूर्त स्वरुप नागरिकांसमोर मांडण्यात आले आहे. त्यामुळेच नाशिकला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक प्रमुख ठिकाण ठरणार आहे.

१६ नोव्हेंबर १९६८ रोजी जनरल परमशिव प्रभाकर कुमारमंगलम यांनी स्वतः या संग्रहालयाची पायाभरणी केली होती, त्यानंतर २७ सप्टेंबर १९७० रोजी लेफ्टनंट या संग्रहालयाचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासूनच या संग्रहालयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. गेल्या काही काळात, पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने जतन संवर्धनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करत तसेच हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या ध्येय उद्दिष्टांना अनुसरून या संग्रहालाचे अनेकदा नूतनीकरण केले गेले आहे.

या संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून बाहेर सामाजासोबत जोडले जाण्याच्या उद्देशाने संग्रहालयाच्या आवारात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट्स साकारण्यात आले आहेत. या सेल्फी पॉईंट्समुळे संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांचा या भेटीचा अनुभव टिपण्याची आणि तो इतरांसोबत सामायिक करण्याची संधी मिळणार आहे. या संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच उमराव सिंग, (व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त ) यांच्या पहिल्या महायुद्धातील ऐतिहासिक पराक्रमांच्या, तसेच बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळच्या प्रसिद्ध टांगेल हवाई हल्ल्याचे प्रेरणादायी चित्रण प्रदर्शन स्वरुपात साकारण्यात आले आहे.

या संग्रहालयातील तोफांच्या आजवरच्या वाटचालीचे दर्शन घडवणारे प्रदर्शनगृह हे या संग्रहालयाचे ठळक वैशिष्ट्य आहे. या प्रदर्शनगृहात ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपासून ते आजच्या समकालीन काळापर्यंत रॉकेट आणि क्षेपणास्त्रांच्या तोफखान्यांमध्ये झालेली प्रगती आणि बदलांचे दर्शन होते. या संग्रहालयात पर्यटकांना इतिहासाचा समृद्ध अनुभव देणारे, पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धासारख्या मोठ्या युद्धांमधील शौर्य आणि बलिदानाच्या गाथांना समर्पित स्वतंत्र प्रदर्शनगृही देखील साकारण्यात आले आहे. सियाचिन सारख्या खडतर हिम प्रदेशातील दहशतवादविरोधी मोहिमा, क्रीडा क्षेत्र तसेच विविध मोहिमा आणि कार्यान्वयातील गनर्स (Gunners) अर्थात तोफखाना विभागाच्या दारुगोळा हाताळणाऱ्या / शस्त्रधारी जवानांचे योगदान आपल्यासमोर मांडणारी प्रदर्शनगृहे देखील या संग्रहालयात साकारण्यात आली आहेत.

देशाची सेवा केलेल्या गनर्स जवानांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी, आणि त्यांचे बलिदान कधीही विस्मृतीत जाणार नाही याची सुनिश्चिती करण्याच्या उद्देशाने, या संग्रहालयात एक रोल ऑफ ऑनर साकारण्यात आले आहे. मुख्य संग्रहालयाबाहेरच्या प्रांगणातही तोफखान्याचे असंख्य भाग मांडले आहेत. इथे पर्यटकांसाठी गुंतवून ठेवणारा लाइट अँड साऊंड शो देखील असून, या शोच्या वेळी तोफखान्याचे हे भाग प्रत्यक्षात कार्यरत असल्याचा जिवंत अनुभव पर्यटकांना येतो.

कारगिल युद्धावरील थ्रीडी चित्रपट हे या संग्रहालयातील उपक्रमांमधले पर्यटकांसाठीचे प्रमुख आकर्षण आहे. या चित्रपटातून पर्यटकांना खडतर प्रदेशात सशस्त्र दलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या आव्हानांचा आणि अशा प्रदेशांसोबत जुळवून घेताना या जवानांना दाखवाव्या लागणाऱ्या लवचिकतेचा समृद्ध आणि तितकाच चित्तथरारक अनुभव घेण्याची संधी मिळते.

भारतीय लष्कराच्या वतीने कुमारमंगलम तोफखाना संग्रहालयाचे दरवाजे जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत, आणि हे संग्रहालय म्हणजे केवळ कलाकृतींचे भांडार नाही, तर ते गनर्स अर्थात आपल्या तोफखाना विभागाच्या दारुगोळा हाताळणाऱ्या / शस्त्रधारी जवानाचे साहस आणि समर्पण भावनेचा जिवंत पुरावा आहे, अशा शब्दांत तोफखान्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अदोष कुमार ( अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक) यांनी उद्घाटनानंतर केलेल्या संबोधनातून आपल्या भावना व्यक्त केल्या. या संग्रहालयाच्या माध्यमातून भावी पिढ्यांना प्रेरणा देणे आणि देशाच्या रक्षणासाठी केलेल्या बलिदानाविषयीचा आदर तळागाळापर्यंत रुजवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

कुमारमंगलम तोफखाना संग्रहालय म्हणजे, भारतीय तोफखान्याच्या गौरवशाली इतिहासाची आणि शौर्याच्या इत्यंभूत माहितीचा अनुभव देणारे संग्रहालय आहे, आणि म्हणूनच ते लष्कराविषयी आत्मियता बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तिसाठी, तसेच नाशिकला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी आवर्जून भेट द्यावे असे गौरवशाली ठिकाण ठरले आहे.

**

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे