आवडीचे क्षेत्र निवडून कठोर परिश्रम केल्यास यश निश्चित – पी.एस.आय.पवन सुपनर

आवडीचे क्षेत्र निवडून कठोर परिश्रम केल्यास यश निश्चित – पी.एस.आय.पवन सुपनर
शरद लोहकरे, लासलगाव…
आपणास ज्या क्षेत्रात करियर करण्याची आवड आहे, ते ठरवून विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी केल्यास यशाचा मार्ग सोपा होतो. उच्चभरारी मिळविण्यासाठी कठोर परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर यांनी केले.
लासलगाव येथील नॅशनल उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये आयोजित दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.योगिता पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.एन.गायकवाड, उपसरपंच रामनाथ शेजवळ, थेटाळेच्या सरपंच सौ.शितल शिंदे, योगेश पाटील उपस्थित होते.
शिक्षणातून कौशल्य मिळाले नाही तर शिक्षण व्यर्थ ठरते, उच्च प्रतीचे यश मिळविण्यासाठी ध्येय, चिकाटी, संयम, बरोबरच कठोर परिश्रम आवश्यक आहे असे शिक्षण विस्तार अधिकारी व्ही.एन. गायकवाड यांनी सांगितले.
याप्रसंगी योगिता पाटील, रामनाथ शेजवळ, शितल शिंदे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी चित्रकला, वकृत्व स्पर्धा, क्रिडा स्पर्धा तसेच विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देऊन परीक्षेला शुभेच्छा देण्यात आल्या.
निफाड येथील कु.रेश्मा नवाब शेख हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल पवन सुपनर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष हारुणभाई शेख यांनी शाळेच्या कार्याचा आढावा सादर केला. मुख्याध्यापिका सलमान मन्सुरी यांनी स्वागत केले. अकीला खान व सय्यदा बानो यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव हसीना शेख, सदस्य हाजी इसाक शहा, अकीलभाई इनामदार, उस्मान शेख, श्रीमती हव्वाबी शेख, हाफिज तौफिक, मौलाना मंजूर मिल्ली, अय्युबभाई पठाण, शकील पठाण, समीर शेख, सिकंदर कादरी, रिझवान शेख, अल्ताफ मणियार, इम्रान मन्सूरी,जमील शेख, रफिक शेख, सोनू शेख, असिफ मुलाणी, बबलू शेख, शफीक शेख, ख्वाजा शेख, हारून बेग, अय्याज शेख, रफिक अत्तार आदी उपस्थित होते.