Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगशैक्षणिक

बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

0 3 2 1 2 3

स्वतःला बदला व सादरीकरणावर भर द्या. चुका शोधा- डॉ. संतोष टकले 

 बिटको महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

नाशिकरोड:  विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सशक्त करण्यासाठी युवकांनी वाचन करणे, व्यवस्थित ऐकणे, समजून घेणे, अनुभवणे आणि सादरीकरण करण्याची सवय लावणे अपेक्षित आहे. आपल्यातील कमतरता व चुका शोधणे . चांगल्या ग्रंथालयांची स्थापना करणे, एक्टीवीटी कीट्सचा वापर करणे, दृकश्राव्य व्याख्याने आयोजित करणे, खगोलशास्त्र कार्यशाळा, आकाश निरीक्षण कार्यक्रम, लोकांना निसर्गाच्या जवळ आणणारे कार्यक्रम आयोजित करणे, चर्चेसाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे क्लब तयार करणे आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी अपेक्षित असा हा बदल घडविण्यासाठी समाजघटकांनी स्वतःला बदलले तरच ते युवकांना बदलू शकतील असे त्यांनी सांगितले. 

‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ निमित्ताने गुरूवार दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील वैज्ञानिक डॉ. संतोष टकले यांनी ‘विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषामध्ये जागतिक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सशक्त करणे’या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात बिटको महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी केलेल्या आवाहनानुसार महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. कल्याणराव टकले, सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, प्रा. डॉ. मीनाक्षी राठी, प्रा. डॉ. कौतिक लोखंडे, प्रा. डॉ. वाल्मिक जोंधळे, प्रा. डॉ. दिनेश बोबडे, प्रा. डॉ. अर्चना पाटील, प्रा. संदीप पिंगळे, प्रा. डॉ. प्रणाली पंडित यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि इतर श्रोते उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे