आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक LDRP सूटचे उद्घाटन

0
4
4
8
0
1
किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक LDRP सूटचे उद्घाटन
मातृत्व प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि स्ट्रेस-फ्री करण्यासाठी नवी सुविधा
नाशिक, दि. २८ मार्च : किम्स मानवता हॉस्पिटलच्या किम्स कड्ल्स (Mother & Child Unit) मध्ये अत्याधुनिक LDRP (Labor, Delivery, Recovery, Postpartum) सूटचे उद्घाटन आज नाशिक महानगरपालिकेच्या महापौर मा. श्रीमती हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
डिलिव्हरी प्रक्रियेदरम्यान सामान्यतः रुग्णाला वेगवेगळ्या टप्प्यांसाठी विविध विभागांमध्ये हलवावे लागते. मात्र, LDRP सूटमुळे लेबर, डिलिव्हरी, रिकव्हरी आणि पोस्टपार्टम या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. त्यामुळे रुग्णाला वारंवार स्थलांतर करण्याची गरज भासत नाही. यामुळे तिचा ताण कमी होऊन संपूर्ण अनुभव अधिक आरामदायी, सुरक्षित आणि आत्मविश्वासपूर्ण बनतो. तसेच, या सुविधेमुळे नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढण्यासही मदत होते.
यावेळी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. राज नगरकर म्हणाले, “किम्स कड्ल्समध्ये आम्ही मातृत्वाला केवळ वैद्यकीय प्रक्रिया न मानता एक भावनिक आणि आनंददायी प्रवास म्हणून पाहतो. अत्याधुनिक LDRP सूटमुळे आईला सुरक्षित, सुसज्ज आणि स्ट्रेस-फ्री वातावरण मिळते. आमच्याकडे उपलब्ध ICU, NICU आणि २४x७ तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममुळे हाय-रिस्क प्रेग्नंसीदेखील सुरक्षितपणे हाताळता येतात. तसेच, रोबोटिक सर्जरीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अधिक अचूक, सुरक्षित आणि कमी वेदनादायक उपचार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रणिता संघवी यांनी सांगितले की, न्यूक्लियर फॅमिली संस्कृतीमुळे गर्भवती महिलांना अनेक शंका निर्माण होतात. यासाठी किम्स कड्ल्समध्ये दर महिन्याला मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन केले जाते. या सत्रांमध्ये योग्य आहार, तपासण्या, जीवनशैली, पेनलेस डिलिव्हरी, नवजात बाळाची काळजी आणि स्तनपान याविषयी सविस्तर मार्गदर्शन दिले जाते. यामध्ये ‘ ‘प्रेग्नेंसी मॉडिफाइड कपल झुंबा’ सारख्या उपक्रमांमुळे पालकांचा सक्रिय सहभाग वाढतो, तसेच सातव्या महिन्यातील डोहाळे जेवणासारखे उपक्रम सकारात्मक वातावरण निर्माण करतात. गेल्या सात महिन्यांत १५० हून अधिक महिलांनी याचा लाभ घेतला आहे.
गेल्या एका वर्षात किम्स कड्ल्समध्ये २५० हून अधिक यशस्वी डिलिव्हरी पार पडल्या असून, त्यामध्ये ट्विन प्रेग्नंसी, IVF, उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच इतर गुंतागुंतीच्या हाय-रिस्क केसेसचा समावेश आहे. अत्याधुनिक ICU, NICU, ब्लड बँक, रेडिओलॉजी व पॅथॉलॉजी सेवा आणि अनुभवी वैद्यकीय टीममुळे हे यश शक्य झाले आहे.
हॉस्पिटलकडून महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित झाले आहेत. त्यामुळे भीती न बाळगता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मातृत्वाचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी बनवावा.
0
4
4
8
0
1



