
भाऊसाहेब हुजबंद, विंचूर –
वाहेगाव साळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुलच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करुन पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासलगाव येथील प्राध्यापिका अनिता गंधे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, निफाड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण खांगळ, संस्थेचे चेअरमन डॉ प्रताप पवार, सचिव डॉ. वैशाली पवार, शिवाजी शिंदे हे होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रताप पवार यांनी आपल्या संस्थेच्या अल्पावधीत शाळेने केलेल्या प्रगतीचे आलेखाची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.
डॉ आत्माराम कुंभार्डे यांनी आपल्या मनोगत श्री नेताजी सुभाष चंद्रबोस गुरुकुल शाळेबाबत कौतुक केले ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने सी.बी.एस.सी. बोर्ड शाळेची स्थापना करू ग्रामीण भागातल्या मुलांना उत्कृष्ट प्रकारचे शिक्षण व भारतीय संस्कृती जोपासली याचे डॉ प्रताप पवार व डॉ वैशाली पवार यांचे कौतुक केले. तर संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उलगडण्याचा प्रयत्न केला.तर अनिता गंधे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनचरित्र कथन करत पत्रकारांच्या कार्याची माहिती आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली.
शिक्षिका सारिका पगारे, शीतल न्याहारकर, नीलिमा हिंगमिरे आदींसह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पत्रकार डी. बी.काद्री, किशोर पाटील, शेखर देसाई, जगन्नाथ जोशी, सुरेश अहिरे, भाऊसाहेब हुजबंद, संदीप शिरसाट, आसिफ पठाण, निलेश देसाई, समीर पठाण, भरत मेचकुल, भाऊसाहेब गोसावी, बाळासाहेब बच्छाव, आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी शिंदे यांनी केले. तर डॉ. वैशाली पवार यांनी आभार प्रदर्शन केले.