ई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रसत्कारसामाजिक
बॉलिवूड क्लासिक्स मैफलने श्रोत्यांना दिले सुरेल समाधान

0
3
2
1
2
3
किरण घायदार, नाशिक …
बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीने सुरेल संगीताचा नजराणा रसिकांना दिला. शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित चित्रपटांची असंख्य गाणी लोकप्रिय आहेत. त्यातील निवडक गाण्यांनी नाशिककर रसिक श्रोत्यांना सुरेल समाधान दिले.
येथील स्वरांजली कराओके स्टुडिओतर्फे रविवारी ( दि.१६ ) ‘ बॉलिवूड क्लासिक्स भाग ३’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी ६ वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या प.सा. नाट्यगृहाशेजारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ही विनामूल्य मैफल झाली. सुरुवातीला मान्यवर रसिकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सागर किनारे दिल ये पुकारे… या गाण्याने प्रारंभ करण्यात आला. कोरा कागज था…,हजार राहे…, तेरे संग प्यार में…, पुछो जरा पुछो…, नैना बरसे…,हम तुम दोनो…जाने क्यूँ लोग… अशा २५ गाण्यांना रसिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या हेमांगीसह सर्व गायकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले व कौतुकाच्या टाळ्या मिळवल्या.
शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी चित्रपट सृष्टीतील गाण्यांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला. संयोजक हर्षद शिंत्रे आणि संजय कथुरीया यांनी स्वागत केले. गायिका पूनम शारंगधर, रेवती वाघमारे, कीर्ती नवलाखे, पूर्वा काबरा,राखी पाटील आणि हेमांगी जोशी या सहभागी झाल्या. गायकांमध्ये हर्षद शिंत्रे, संजय कथुरीया यांच्या समवेत अविनाश विसपुते, विजय माळी, भूषण कुलकर्णी, धनंजय भावसार, विनय चंद्रात्रे यांचा समावेश होता. उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. समीर ओतुरकर यांनी शास्त्रीय संगीत, संगीतकार व त्यांनी दिलेली गाणी याविषयी अभ्यासपूर्ण निवेदन केले. नाशिककर रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहून गाण्यांचा आस्वाद घेतला. वन्समोअर देत गायकांना प्रोत्साहन दिले.
0
3
2
1
2
3