
0
2
5
6
3
3
बोलठाण नाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
मुक्ताराम बागुल, नांदगाव…
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या बोलठाण येथील नाक्यावर वाहतुकीची कोंडी होत असून संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांची व प्रवाशांची गैरसोय होत आहे.
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे असलेल्या नाक्यावर गावातून बाहेर येणाऱ्या व बाहेर गावातून येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सदरची वाहतूक होण्यासाठी जवळजवळ एक घंटा लागला. व नागरिकांची व प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यातच वाहन चालकांना देखील वाहन चालवताना अत्यंत कसरत करावी लागली. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन होईल व नागरिकांची, प्रवाशांची गैरसोय म्हणून दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0
2
5
6
3
3