निवडमहाराष्ट्रराजकियसत्कार
डॉ किशोर कुवर यांची नाशिक जिल्हा भाजपा उद्योग आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड

0
2
5
6
3
3
डॉ किशोर कुवर यांची नाशिक जिल्हा भाजपा उद्योग आघाडी च्या सरचिटणीस पदी निवड
महेश कुवर/ कळवण प्रतिनिधी-
कळवण येथील उद्योजक डॉ किशोर कुवर यांची नाशिक जिल्हा भाजपा उद्योग आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.सदर नियुक्तीचे पत्र उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष उद्योजक विठ्ठल जपे यांच्या हस्ते स्टाईस चे अध्यक्ष श्री नामकर्ण आवारे यांचे उपस्थितीत सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीच्या उद्योग भवन कार्यालयात देण्यात आले.
डॉ किशोर कुवर हे शहरातील उद्योजक असून ते नाशिक विभागीय औद्योगिक सहकारी वसाहत संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.गेल्या पंचवीस वर्षांपासून ते उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांच्या रोजगार स्वयंरोजगार, उद्योग,सामाजिक शैक्षणिक, तसेच सहकार आदी क्षेत्रातील कामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली.ते शासनाच्या विविध शासकीय समित्यावर विद्यमान अशासकीय सदस्य आहेत.या निवडीमुळे योग्य व्यक्तीची निवड झाल्याचे उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी म्हटले आहे.त्यांच्या निवडीचे कळवण येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजक व व्यापारी तसेच जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले जात आहे.
नाशिक जिल्ह्याच्या प्रामुख्याने इगतपुरी,घोटी सुरगाणा,पेठ, सटाणा, देवळा आदी तालुक्यात औद्योगिक सहकारी वसाहती स्थापन न
झाल्यामुळे या परिसरात औद्योगिक विकास झालेला दिसून येत नाही त्यासाठी तेथील तरुण उद्योजकांना सोबत घेऊन भाजपा उद्योग आघाडीच्या माध्यमातून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन याठिकाणी सहकारी औद्योगिक वसाहती स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर करणार असल्याचे डॉ किशोर कुवर यांनी सांगितले
“मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना डॉ किशोर कुवर नवउद्योजकांमध्ये रुजवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो” -श्री विठ्ठल जपे
जिल्हाध्यक्ष, भाजपा उद्योग आघाडी
“नाशिक जिल्ह्याबरोबरच प्रामुख्याने जिल्ह्यातील कळवण सुरगाणा पेठ सटाणा इगतपुरी घोटी आदी परिसरातील युवक युवतींना, आदिवासी युवकांना रोजगार व स्वयंरोजगार,बाबत शासनाच्या सूक्ष्म व लघु उद्योगाच्या योजना,सवलतींबाबत माहितीपर मार्गदर्शन शिबीरे भाजपा उद्योग आघाडीच्या माध्यमातून आयोजित करणार ” – डॉ. किशोर कुवरनवनिर्वाचित सरचिटणीस
भाजपा उद्योग आघाडी, नाशिक
0
2
5
6
3
3