Breaking
ब्रेकिंग

सिंपल एनर्जीचा महाराष्ट्रात विस्तार; नाशिकमध्ये पहिले ‘सिंपल स्टोअर’ सुरू

0 4 4 8 0 0

सिंपल एनर्जीचा महाराष्ट्रात विस्तार; नाशिकमध्ये पहिले ‘सिंपल स्टोअर’ सुरू

नाशिक: भारतातील होम-ग्रोन ऑटोमोटिव्ह कंपनी सिंपल एनर्जीने महाराष्ट्रातील आपला रिटेल विस्तार करत नाशिकमध्ये पहिले ‘सिंपल स्टोअर’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. शहाणे ऑटोव्होल्ट यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेले हे 765 चौ. फूट क्षेत्रफळाचे ‘सिंपल स्टोअर’ असून, त्यासोबतच केवळ 1.3 किमी अंतरावर 1,000 चौ. फूट क्षेत्रफळाचे पूर्णतः सुसज्ज सर्व्हिस सेंटरही उपलब्ध आहे. ग्राहकांना सोयीस्कर विक्रीनंतरची सेवा मिळावी आणि उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करता यावा, यासाठी कंपनीच्या विस्तार धोरणाचा हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

आधुनिक आणि ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केलेले हे स्टोअर उत्तम ब्रँड अनुभव देते. येथे सिंपल एनर्जीच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन आहे, ज्यामध्ये नवीन ‘सिंपल वन जेन 2’ मॉडेलचा समावेश आहे. हे मॉडेल दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 4.5 किलोवॅट अवर बॅटरीमध्ये 236 किमी रेंज मिळते, तर 5 किलोवॅट अवर बॅटरीमध्ये 265 किमी रेंज मिळते. तसेच, ‘सिंपल वन एस जेन 2’ मॉडेलही येथे उपलब्ध असून त्याची रेंज 190 किमी आहे. याशिवाय विविध अॅक्सेसरीजही येथे उपलब्ध आहेत.

लॉन्चबाबत बोलताना, सिंपल एनर्जीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास राजकुमार म्हणाले, “नाशिकमध्ये आमचे पहिले ‘सिंपल स्टोअर’ सुरू करणे हे पश्चिम भारतात विस्तार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्र हे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रगत बाजारपेठांपैकी एक आहे आणि नाशिक आमच्यासाठी मोठी संधी आहे. या लॉन्चद्वारे आम्ही केवळ आमची विक्री वाढवत नाही, तर या भागातील सेवा आणि सपोर्ट व्यवस्था अधिक मजबूत करत आहोत. आमचा नेहमीच लांब रेंज आणि उच्च कार्यक्षमतेचे स्कूटर्स तयार करण्यावर भर राहिला आहे, जे रोजच्या प्रवासाला अधिक सोयीस्कर बनवतात. नाशिकमधील ग्राहकांना हे स्कूटर्स सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे पाऊल मार्च 2026 पर्यंत देशभरात 100 स्टोअर्स सुरू करण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

सध्या सिंपल एनर्जी 35 पेक्षा अधिक शहरांमध्ये 65 आऊटलेट्स चालवत आहे, ज्यामध्ये बेंगळुरू, दिल्ली, पाटणा, भोपाळ, आग्रा, गोवा, विजयवाडा, हैदराबाद, विशाखापट्टणम, कोची आणि चेन्नई यांचा समावेश आहे. कंपनी संपूर्ण भारतात जलद गतीने विस्तार करत आहे. येत्या काही महिन्यांत सिंपल एनर्जी औरंगाबाद, नागपूर, रांची आणि भुवनेश्वर यांसारख्या शहरांमध्येही विस्तार करणार आहे.

‘सिंपल वन जेन 2’ च्या 4.5 किलोवॅट अवर व्हेरिएंटची किंमत रु.1,69,999 पासून (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) सुरू होते, तर 5 किलोवॅट अवर व्हेरिएंटची किंमत रु.1,77,999 पासून (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) आहे. ‘सिंपल वन एस जेन 2’ ची किंमत रु.1,49,999 (एक्स-शोरूम, महाराष्ट्र) आहे. ग्राहक स्टोअरला भेट देऊन टेस्ट राईड घेऊ शकतात, अॅक्सेसरीज पाहू शकतात किंवा स्कूटर बुक करू शकतात. टेस्ट राईड आणि बुकिंगची सुविधा ऑनलाइनही https://www.simpleenergy.in/ येथे उपलब्ध आहे.

नाशिकमधील सिंपल एनर्जी स्टोअरचा पत्ता: सर्वे क्र. 513/1, दुकान क्र. 6, लेंकर’स मॅजेस्टिक कमर्शियल, डॉ. होमी भाभा नगर, न्यू आग्रा मुंबई हायवे, मुंबई नाका, नाशिक, महाराष्ट्र – 422011.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 8 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे