Breaking
ई-पेपरसंपादकीयसामाजिक

चैतन्यदायी शिक्षणयात्री- श्री वसंत पांडुरंग सुपारे सर

0 4 2 9 5 7

सागर निकाळे, निफाड प्रतिनिधी-
मालेगाव तालुक्यातील दाभाडी या खेड्यातील सामान्य कुटुंबातील मुलगा म्हणजे वसंत पांडुरंग सुपारे.घरप्रपंच चालविण्यासाठी आईवडिलांना मदत व्हावी म्हणून शिक्षण घेत घेत मिळेल ती कामे केली.घरची परिस्थिती बेताचीच पण अंगी जिद्द मोठी.त्याच बळावर आपले डि.एड.शिक्षण पुर्ण करून सुरगाणा तालुक्यातील गुही वनवासी कल्याण आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षक पदी रुजू होऊन 1988 मध्ये शिक्षण यात्रेचा श्रीगणेशा झाला.
त्याकाळी सुरगाणा अतिशय दुर्गम, दळणवळणाच्या साधनांची मोठी वानवा.अनेकदा उंबरठाण येथुन 15 किमी पायी चालत जावे लागत.वीज,पाणी या सुविधाही तोकड्या.अशा बिकट परिस्थितीत त्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य आरंभिले.त्यानंतर 1993 मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या पेठ तालुक्यातील.कोळुस्ते या गावी नेमणूक झाली.तिथेही परिस्थिती तशी च.तिथेही त्यांनी आपला ठसा उमटवला.अनेक विद्यार्थी घडवले.
1996 मध्ये निफाड तालुक्यात बदली झाली अन् नांदुर मध्यमेश्वर, खडक माळेगांव,सोने वाडी बु. आणि निफाड नं1 या शाळांमध्ये त्यांनी आपल्या मधुर वाणी आणि प्रेमळ स्वभावाने अन् गायन वादनाने विद्यार्थ्यांना आपलंसं करून शिक्षणाची गोडी वाढवली.जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत दरवर्षी गीत गायन या प्रकारात जिल्हा पातळीवर मजल मारून बक्षिसे मिळविली.
कुठल्याच कामाची लाज न बाळगता शाळेला कुटुंब मारुन काम करणारा शिक्षक ,पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांना मदत करणारं व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून स्वखर्चाने दरवर्षी बक्षिसे देणारे प्रेरक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
माणसं जोडणं हा तर सरांचा छंदच.एकदा का एखादा विद्यार्थी त्यांच्या सहवासात आला की त्याचा, त्यांच्या पालकाचा अन् सरांचा ऋणानुबंध कायमचा जुळलाच म्हणून समजावा.सुरगाणा ,पेठ या तालुक्यातून बदली होऊन वीस वर्षांनंतर ही अनेक विद्यार्थी,पालक त्यांच्या संपर्कात असतात ही मोठी कमाई म्हणावी लागेल.खेळकर स्वभाव,मदतीचा गुण यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटणारे.त्यांचे अनेक विद्यार्थी आज चांगली पदे भुषवित आहेत.सहकारी शिक्षकांशी मैत्री पुर्ण संबंध ठेवून त्यांनी अनेक शाळांमध्ये चैतन्य फुलवले हे मात्र नक्की.
असा हा शिक्षण यात्रेतील अवलीया शिक्षक श्री. वसंत पांडुरंग सुपारे सर(तात्या) हे 31 मे 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त हा शब्द प्रपंच.
जे मिळाले व्रत माणसा, ते इमाने करावे
इतरांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरावे.

शब्दांकन –
श्री. विकास नागनाथ मुळे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे