Breaking
शैक्षणिक

मागासवर्गीय मुला व मुलींचे वसतिगृहात प्रवेशासाठी 2 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत : सुंदरसिंग वसावे

0 3 2 1 2 3

नाशिक, दिनांक 24 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नाशिक या कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला व मुलींच्या शासकीय वसतीगृहांमध्ये 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज 2 जुलै 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण नाशिकचे सहाय्यक संचालक सुंदरसिंग वसावे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय व निश्चित केलेल्या आरक्षणानुसार प्रवेश घेता येईल.

वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थांना निवास, दरमहा निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्यासाठी भोजन भत्ता, डीबीटी रक्कम व गणवेश ड्रेसकोड रक्कम इत्यादी व इतर अनुषंगिक सोयी- सुविधा शासानामार्फत पुरविण्यात येतात.

वसतिगृह प्रवेशासाठी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण नाशिक (सामाजिक न्याय भवन परिसर), नासर्डी पुल, नाशिक- पुणे रोड, नाशिक या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थांनी प्राप्त अर्ज परिपूर्ण भरून 2 जुलै 2024 पर्यंत संबधित वसतिगृहात सादर करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, इतर मागस बहुजन कल्याण नाशिक (सामाजिक न्याय भवन परिसर), नासर्डी पुल, नाशिक- पुणे रोड, नाशिक या कार्यालयात संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे