Breaking
ब्रेकिंगराजकियसामाजिक

कोण आहेत भगवान माऊली सोनवणे?

निर्भीड आवाज या वृत्तपत्राचा मुख्य संपादक म्हणजेच भगवान माऊली सोनवणे ?

0 1 5 1 2 0

प्रचंड प्रतिप्रतिकूल परिस्थितीतून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज या वृत्तपत्राचे प्रकाशन करून गेल्या दहा वर्षात देदीप्यमान यश संपादन करून आवाज या वृत्तपत्राला आज एक दशक वर्ष पूर्ण झालं.
बघता बघता जनसामान्यांच्या समस्यांना व अन्यायाला वाचा फोडत निर्भीड आवाज या वृत्तपत्रांनं नांदगावच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे मन जिंकून घेतलं आणि या दैनिक आवाज चे मुख्य संपादक भगवान माऊली सोनवणे यांच्या नावाची चर्चा खरं गेल्या पंचवार्षिक मध्ये होऊ लागली . नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये हे नाव चर्चेत आलं . त्या अगोदर साकोरा गटातून कपबशी या चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढवली . मात्र थोड्या मतावरून अपयश आलं . परंतु म्हणतात ना अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या निर्मळ पाण्याचा झरा असतो, अगदी त्याच प्रकारे भगवान माऊली नावाच्या या अवलियाने 2019 च्या नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदारकीसाठी उमेदवारी केली , परंतु आर्थिक मातब्बर जातीपातीचे राजकारण करणाऱ्या उमेदवारांपुढे पुन्हा अपयश आलं. परिस्थिती परिस्थीती खालावली. आर्थिक , मानसिक, शारीरिक परिस्थिती खालावली असताना देखील, पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशी भरारी घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या या ध्येय वेड्या अवलियाने दैनिक आवाज या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जाऊन, त्यांच्या समस्या, त्यांच्या अडचणींवर मात करायला सुरुवात केली. जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आवाज या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनसमान्यांच्या मनामध्ये चांगलं स्थान मिळवल. आता मात्र दैनिक आवाज वृत्तसेवा हा पेपर संपूर्ण जिल्हाभर नव्हे तर राज्यभर नावलौकिक मिळू लागलाय . खरंतर या ध्येयवेड्या भगवान माऊलीने सर्वांची माऊली होऊन गोरगरीब , दिन दलित, मागासवर्ग, इतर मागासवर्ग, शालेय विद्यार्थी या सर्वांच्याच अडीअडचणी, समस्या, सुखदुःख यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. मराठा आरक्षण असो की ओबीसी मोर्चा,खासदारकी साठी तालुक्यातील मांडवड गावचे भूमिपुत्र अनिल बर्डे असो की मुळंडोंगरी येथील ग्रामपंचायत असो अशा सर्व ठिकाणी सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून हक्काच्या मागणीसाठी साथ देणारे असे व्यक्तिमत्व म्हणून नावलौकिक मिळविलेले माऊली अर्थात भगवान नामदेव सोनवणे . नुकतेच नांदगाव शहरात “काव्यधारा कविसंमेलन” आयोजित करून राज्यभरातून आलेल्या कवी- कवयित्रींच्या माध्यमातून तालुक्यातील साहित्याच्या चळवळीला गती देऊन तालुक्याचे नाव सर्वदूर चर्चेत आणले. बालिका दिन,जागतिक महिला दिनाच्या दिवशी “बालसंगोपन किट वाटप” उन्हाळ्यात पांढऱ्या कॅप वाटप केले.
नवक्रांती युवक संघाच्या माध्यमातून आजपावेतो एक- युवक, एक -झाड या संकल्पनेतून 2018 मध्ये प्रत्येक गावात जाऊन हजारो झाडे लावलीच नव्हे तर ती जगवली देखील आहे, 21 डिसें 2018 मध्ये आपल्या 31 व्या वाढदिवसानिमित्त राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,शासकीय क्षेत्रातील 31 व्यक्तींना “आवाज रत्न”पुरस्कार देऊन सन्मानित केले तसेच युवकांच्या विविध खेळात बक्षीस वाटपात देखील अग्रभागी आहे. मनमाड येथील मैदानावर भगवान(माऊली) सोनवणे चषक भरवून , क्रिकेट खेळणाऱ्या युवकांना प्रोत्साहित केले . मागील वर्षीच्या गणेशोत्सवात तरुण मित्रमंडळासाठी स्वतंत्र आणि घरगुती गणपती साठी “माझ्या पप्पांनी गणपती आणला” स्पर्धा भरवून दोघेही गटात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वाटप केले. त्यांनी जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न करतांना, हजारो शालेय दप्तर,शालेयोपयोगी वस्तू वाटप केल्या. आणि यंदा तर दैनिक आवाजच्या दशकपूर्ती निमित्त, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 10 हजार वह्या वाटपाचाकेलेला निर्धार पूर्ण केला. असे अनेक उपक्रम राबविले.
खरं म्हणजे जातीचं लेबल नसलेल्या, भगवान माऊली सोनवणे या व्यक्तिमत्वाला समाजातील सर्व स्तरातून आदराचे स्थान प्राप्त झालं आहे , आज पुन्हा एकदा 2024 च्या नांदगांव विधानसभा मतदारसंघांमध्ये सोनवणे यांनी उमेदवारी करावी. यासाठी जनसामान्यातून चर्चेला उधाण आलं आहे. कांदे , भुजबळ , पवार, आहेर यांसारख्या विधानसभा निवडणूक लढवणाऱ्यांमध्ये भगवान माऊली सोनवणे हे नाव सुद्धा आता आग्रहाने घेतले जात… जर भगवान माऊली सोनवणे यांनी विधानसभा निवडणूक लढवली तर नक्कीच विधानसभेचे गणित बदलू शकतं . कारण आपल्या हक्काचा आणि आपल्या मातीतला माणूस मिळावा ही प्रत्येक नांदगाव विधानसभा मतदारसंघातील मतदाराची इच्छा आहे . आणि त्यामुळे यावेळेस भुजबळ , कांदे यांना टक्कर देणारे एका ध्येयवेड्या अवलियाने विधानसभेची तयारी सुरू केली आहे . भगवान माऊली सोनवणे यांच्या पदरात नांदगावकर काय देतील ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे