आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
७०००+ यशस्वी न्यूरोसर्जरींचा अभूतपूर्व टप्पा; डॉ. शेखर चिरमाडे यांच्याकडून हजारो रुग्णांना नवजीवन

0
4
6
8
5
8
७०००+ यशस्वी न्यूरोसर्जरींचा अभूतपूर्व टप्पा; डॉ. शेखर चिरमाडे यांच्याकडून हजारो रुग्णांना नवजीवन
नाशिक :
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि स्पाईन सर्जन डॉ. शेखर चिरमाडे यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत ७००० हून अधिक यशस्वी न्यूरोसर्जरी पूर्ण केल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे न्यूरोसर्जरी क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित झाले आहे.
गेली २८ वर्षे डॉ. चिरमाडे न्यूरोसर्जरी क्षेत्रात कार्यरत असून, विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा दिली आहे. त्यापैकी १७ वर्षे त्यांनी विविध हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र प्रॅक्टिस केली असून, गेल्या ८ वर्षांपासून ते अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलशी संलग्न आहेत.
विशेष म्हणजे, डॉ. चिरमाडे यांनी त्यांच्या एकूण ७०००+ न्यूरोसर्जरींपैकी २५०० हून अधिक न्यूरोसर्जरी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. तसेच, योग्य निदान, औषधोपचार, फिजिओथेरपी आणि वेळेवर उपचार यांच्या मदतीने अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेविना यशस्वीरित्या बरे करण्यात आले आहे.
या कालावधीत ब्रेन ट्यूमर, स्पाईनचे विकार, अपघातातील गंभीर दुखापती तसेच मेंदू व मणक्याशी संबंधित अनेक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या हाताळण्यात आल्या आहेत.
यावेळी बोलताना डॉ. शेखर चिरमाडे म्हणाले,
“७००० हून अधिक न्यूरोसर्जरी पूर्ण करणे ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि जबाबदारीची गोष्ट आहे. प्रत्येक रुग्ण हा आमच्यासाठी एक नवीन अनुभव असतो. रुग्णांचा आमच्यावर असलेला विश्वास हेच आमचे सर्वात मोठे बळ आहे. योग्य निदान आणि वेळेवर उपचार यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेविनाही बरे करता येते.”
ते पुढे म्हणाले,
“अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आम्ही Minimally Invasive Spine Surgery (MIS Surgery) ची सुरुवात केली असून, त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि जलद रिकव्हरीचा फायदा मिळत आहे. तसेच, ट्रॉमा आणि अपघातांमध्ये ‘Golden Hour’ अत्यंत महत्त्वाचा असतो. हॉस्पिटलमध्ये CT Scan, अत्याधुनिक ICU, Emergency Care आणि सर्व सुपरस्पेशालिटी तज्ज्ञ एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळतात.”
या यशामध्ये भूलतज्ज्ञ, नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे मोलाचे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. अखिलेश सोमानी, प्रमुख – आपत्कालीन वैद्यक विभाग (Head of Emergency Medicine Department), अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे देखील उपस्थित होते. त्यांनी यावेळी आपत्कालीन वैद्यक (Emergency Medicine) या शाखेबाबत थोडक्यात माहिती देत, गंभीर अपघात आणि ट्रॉमा केसेसमध्ये तातडीच्या उपचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, त्यांनी डॉ. शेखर चिरमाडे यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांचे विशेष स्वागत केले.
यावेळी बोलताना अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,
“डॉ. शेखर चिरमाडे यांनी गाठलेला ७०००+ न्यूरोसर्जरींचा टप्पा हा अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यापैकी २५०० हून अधिक यशस्वी न्यूरोसर्जरी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पार पडल्या आहेत, ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि तातडीच्या उपचार सुविधांमुळे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी क्षेत्रात विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.”
या कार्यक्रमात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये मेंदू, मणका आणि न्यूरोलॉजिकल आजारांवरील अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असून, रुग्णांना अचूक निदान आणि तज्ज्ञ उपचार देण्यासाठी हॉस्पिटल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0
4
6
8
5
8



