आरोग्य व शिक्षणब्रेकिंगशैक्षणिकसत्कार
विंचूरच्या कु. अलिशा मोमीनची प्रेरणादायी कामगिरी

0
3
2
1
2
3
विंचूर येथील इयत्ता दूसरी शिकणारी कु आलिशा अजहर मोमीन या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसानिमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे डस्टबिन गिफ्ट दिले.
कु. अलिशाची ही कामगिरी कौतुकास्पद आहे. एकीकडे वाढदिवसाच्या निमित्ताने आर्थिक उधळपट्टी केली जाते. मुलांचे हट्ट पुरविण्यासाठी त्यांचे पालक सढळ हाताने खर्च करतात. रात्री उशिरापर्यंत समारंभ साजरे केले जातात. मात्र अलिशा नावाच्या या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याच शाळेत दिलेली ही भेटवस्तु दैनंदिन उपयोगी पडणारी आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील याबाबत एक संदेश मिळणार असून बालवयापासूनच यातून बोध घेता येणार आहे.
0
3
2
1
2
3