श्रीकृष्णाची महिमा अपरंपार
श्रीकृष्णाची महिमा अपरंपार.
श्रावण कृष्णपक्ष अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव संपूर्ण भारतात गोकुळ अष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी या नावाने मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केल्या जातो.पौराणिक कथेनुसार कृष्णाचा जन्म मथुरा येथे वासुदेव आणि देवकीच्या पोटी झाला.तेव्हा या दोघांना कंसाने बंदीस्त करून ठेवले होते. कंस हा अहंकारी राजा होता.त्याच्या अहंकाराने प्रजा अत्यंत त्रस्त होती.अशा परिस्थितीत आकाशवाणी होते. त्यात कंसाला सांगितले जाते की हे कसं तुझा शेवट देवकीचा आठवा पुत्र करेल.आकाशवाणीमुळे कंस भयभीत होतो आणि वासुदेव व देवकीला बंदीस्त करतो.अशा परिस्थितीत देवकीला सात पुत्र होतात त्यांचा सर्वांचा वध कंस करतो.यात आठवा पुत्र श्रीकृष्ण वाचतो आणि पुन्हा आकाशवाणी होते हे कंसा ज्याच्या हातांनी तुझा मृत्यू होणार आहे त्यांनी जन्म घेतलेला आहे सावधान!महाभारत ही पौराणिक कथा आहेच.परंतु आपल्या जीवनात घडणारे प्रसंग सुध्दा आहेत.जन्माष्टमीचा सण श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला साजरा करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.श्रावण महिन्यांतील कृष्णपक्षातील अष्टमीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला.जन्माष्टमीच्या दिवशी लोक भक्तिभावाने उपवास करून पुजाअर्चना करतात व श्रीकृष्णाच्या जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो.हा उपवास नवमीला संपतो.संपुर्ण भारतात आपल्याला जन्माष्टमीचा अनेक मोठ-मोठे कार्यक्रम पहायला मिळतात.या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दहिहंडीचे कार्यक्रम दिसून येतात.अनेक बालगोपाल (गोविंदा)या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात. जन्माष्टमीच्या दिवशी अनेक भाविक श्रीकृष्णाची स्थापना करतात व मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात येते.कोणाकडे श्रीकृष्ण (काणोबा) दिड दिवसांचा असतो तर कोणाकडे पाच दिवसांचा असतो.या कालावधीत पुजाअर्चना करून आपली मनोकामना पूर्ण करण्याचे साकडे भक्तगण घालतात व विसर्जनाच्या दिवशी घरगुती दहिहांडी फोडून काला करतात आणि सर्वांना प्रसाद म्हणून वाटण्यात येतो.भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहेत.अहंकारी कंसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीकृष्णावतार धारण केला व कृष्णाने मामा कंसाचा वध केला.ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण लहाण्याचे मोठे झाले ते ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेशातील (मथुरा-वृंदावन) याठिकाणी जन्माष्टमीला मोठे उत्साहाचे आनंदाचे वातावरण असते.भारतातील संपूर्ण श्रीकृष्ण मंदिरांची सजावट करून मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा केला जातो.भारतातील जगप्रसिद्ध मथुरा आणि वृंदावनमधील सर्व श्रीकृष्ण मंदिरे पहाण्यासाठी देशातील तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण व पर्यटक इथे येऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतात.गुजरातमधील व्दारका येथे एक वेगळा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी कृष्णाने आपले राज्य स्थापन केले होते.महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जन्माष्टमीच्या दरम्यान दही हंडीचे कार्यक्रम करून उत्सव साजरा करतात.त्याचप्रमाणे गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील शेतकरी बैलगाड्या सजवून त्यावर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून नाचत-गाजत मिरवणुक काढतात.अशाप्रकारे संपूर्ण भारतात जन्माष्टमी आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.महाभारतात श्रीकृष्णाने सत्याची बाजू घेत शेवटपर्यंत अर्जुनाचे सारथी रहाले.बाळ श्री कृष्ण दही आणि लोणी नेहमी खायचा त्यांचे आवडीचे प्रतीक आणि आपल्यासाठी प्रसाद म्हणून महाराष्ट्रात दहीहंडीची प्रथा आहे.जन्माष्मी भारतातच नाही तर जगातील अनेक देशांतील भारतीय श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी करतात.कारण भारतातील संस्कृतीने अनेक देशांना बरेच काही दिले आहे. देवकी मानवी देहाचे प्रतीक मानले जाते तर वासुदेव प्राणशक्तीचे प्रतीक आहे.मानवी देहामध्ये जेव्हा प्राणशक्ती वृध्दिंगत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाची म्हणजे आनंदाची अनुभूती प्राप्त होते.त्यामुळे आपल्याला सर्वत्र मंगलमय वातावरण दिसून येते.सृष्टीचे पालनहार म्हणजे विष्णूचे आठवे अवतार भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मत्सोवाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात वृक्षारोपण व्हायला पाहिजे.कारण श्रीकृष्णाचा सहवास बालगोपालांसोबत वृक्षांच्या सानिध्यात रहायचा. त्यामुळे आज आपणास सर्वांवर ती वेळ येऊन ठेपली आहे की वृक्ष बिना जीवन अधुरा. यामुळे आज वृक्ष लागवड अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे सर्वत्र हिरवागार गालिचा निर्माण होईल व संपूर्ण भारत भुमि(सृष्टी)प्रफुल्लित राहील.गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.