नाशिक शहरात तिरंगा पदयात्रेचे आयोजन
नाशिक महानगरपालिका,जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१४ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा कार्यक्रमा अंतर्गत सकाळी १० वाजता तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते.पदयात्रा राजीव गांधी भवन ते सीबीस येथील हुतात्मा स्मारक येथे आयोजन करण्यात आले होते.
पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथामनपा आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.तत्पूर्वी शर्मा यांनी तिरंगा कॅनव्हासवर जय हिंद असे लिहुन स्वाक्षरी करत तिरंगा कॅनव्हास अभियानात सहभाग घेतला.तसेच तिरंगा सेल्फी पॉईंट येथे तिरंग्या सोबात सेल्फी काढली.
तिरंगा पदयात्रे दरम्यान हजारो शालेय विद्यार्थी मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पदयात्रे दरम्यान जलज शर्मा हे स्वतः राजीव गांधी भवन ते हुतात्मा स्मारक पायी चालत गेले.हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या वारसांचा सत्कार यावेळी करण्यात आला.उपस्थित सर्वाना जलज शर्मा यांनी उद्या १५ ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन यावेळी केले.
या पदयात्रे दरम्यान जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त जलज शर्मा,अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ,उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण,उपायुक्त अजित निकत,नितीन नेर, शहर अभियंता संजय अग्रवाल,नगररचना उपसंचालक हर्षल बाविस्कर,शिक्षण अधिकारी बी टी पाटील,घनकचरा विभाग संचालक डॉ.आवेश पलोड,मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट,मुख्यलेखा परीक्षक बळवंत गायकवाड, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे,मलेरिया विभागाचे डॉ.नितीन रावते,स्वीय सचिव दिलीप काठे,लघुलेखक कैलास दराडे,जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, आस्थापना अधीक्षक रमेश बहिरम,सचिन निमोणकर,संतोष कान्हे,प्रदीप नवले,मनीषा पाटेकर,साहेबराव भोसले,शंकरराव पोरजे,सागार पीठे,रमेश पागे,दिपक बंदरे,चैताली वलवे,मीना खैरनार,आरती मारू,उषा चंद्रमोरे,भाग्यश्री कानडे ,हेमांगी जाधव,जिजा राऊत,वैशाली औटे,पल्लवी वक्ते,रंजना शिंदे,सुलभा कुलकर्णी आदी अधिकारी व कर्मचारी उपिस्थत होते.