Breaking
ब्रेकिंग

विंचूर जवळ बिबटयाच्या हल्ल्यात दोन मेंढया ठार

मेंढपाळही जखमी

0 1 5 1 2 0

विष्णूनगर जवळ बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार तर मेंढपाळ जखमी 

विंचूर ता.२८ येथून जवळ असलेल्या विष्णूनगर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार तर मेंढपाळ जखमी झाला असल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. गेल्या पंधरा दिवसापासून विष्णूनगरच्या वेगवेगळ्या मळ्यात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. काळु हरी कांदळकर रा.सटाणा (वय १९) जखमी झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे.

    विंचूर पासून जवळच असलेल्या विष्णूनगर येथे देवकी लॉन्स च्या शेजारी मेंढपाळ मेंढ्यांसह कुटुंब झोपलेले असताना बुधवार ता.२८ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान बिबट्याने मेंढ्यांच्या रहावटीत शिरकाव करून मेंढ्यावरती हल्ला केला.त्यात दोन मेंढ्या ठार झाल्या.दरम्यान मेंढपाळला असे वाटले की, मेंढ्यामध्ये कुत्रा घुसला आहे त्याला उसकावण्यासाठी मेढपाळ मेंढ्याच्या राहवटीत गेला असता. बिबट्याने मेंढपाळवर हल्ला चढवला.सुदैवाने हल्ल्यात मेंढपाळ हे थोडक्यात बचावले असले तरी त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणावर जखम होऊन मेंढपाळ जखमी झाला आहे. जखमी मेंढपाळला उपचारार्थ नैताळे येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले.यावेळी परिसरातील नागरिकांनी ॲम्बुलन्स साठी १०८ नंबर वर संपर्क साधला परंतु फोन उचलला गेला नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.विंचूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी,तलाठी,वन विभागाचे अधिकारी यांनी येऊन पंचनामा केला आहे. वन विभागाकडून पिजरा लावण्यात आला असून लवकरात लवकर भरपाई मिळावी, अशी मागणी मेंढपाळ कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

पिंजरा लावण्यास वन विभागाची दिरंगाई

पंधरा दिवसापूर्वी प्रवीण भडांगे यांच्या द्राक्ष बागेत बिबट्याने मोरावर हल्ला केला असल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी साहेबराव खापरे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.गेल्या चार-पाच दिवसापूर्वी भाऊसाहेब गावडे यांच्या शेतात महिला काम करत असताना बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करताना महिलांनी बघितलं.ह्या सगळ्या घटनांची माहिती विष्णूनगर येथील पोलीस पाटील रामकिसन सुराशे यांनी वन विभागाला वारंवार देऊन पिंजरा लावण्याची मागणी केली होती.परंतु वन विभागाकडून अद्याप पिंजरा लावण्यात आला नसल्याने वन विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. बुधवारी मेंढपाळावर हल्ला झाल्यानंतर वन विभागाने पिंजरा लावला असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे