आरोग्य व शिक्षणशैक्षणिक
“अपती (विधवा)महिलांचा सुद्धा हळदी कुंकूवर अधिकार आहे” डॉ वैशाली प्रतापराव पवार
श्री नेताजी सुभाष चंद्र बोस स्कूल मधे महिला दिन साजरा

0
2
5
6
2
9
“अपती (विधवा)महिलांचा सुद्धा हळदी कुंकूवर अधिकार आहे”
डॉ वैशाली प्रतापराव पवार
श्री नेताजी सुभाष चंद्र बोस स्कूल मधे महिला दिन साजरा
वाहेगाव – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. प्रतापराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अपती पण अतिशय खंबीर कर्तबगार आणि अत्यंत धाडसी अशा महिलांचा सम्मान आणि सत्कार करण्यात आला अशी माहिती मुख्याध्यापिका सौ संदीप कौर सेखो यांनी दिली.

कार्यक्रमांच्या प्रमुख पाहुन्या म्हणून श्रीमती संगीता राजेंद्र ठुबे व श्रीमती उर्मिला खोकले या लाभल्या यांचा सम्मान मानचिन्ह भेट वस्तू आणि हळद कुंकू लावून करण्यात आला पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शाळा आणि परिसर तसेच शाळेत शिक्षणा सोबत संस्कार देतात ही बाब आवडल्याचे नमूद केले डॉ वैशाली प्रतापराव पवार यांनी आपल्या मनोगतात संगीता ताई आणि उर्मिला ताई यांचा आदर्श घेऊन जीवनात अभाव न बघता हसत हसत आव्हानाला सामोरे जावे असे शिक्षक आणि विद्यार्थाना सांगितले.
डॉ प्रतापराव पवार यांनी प्रत्येक महिलेला सम्मान करावा असे मुलांना शिकवले. श्री विजय माथा यांनी अतिशय रंजक पद्धतीने स्त्री चे महत्व सांगितले.
कार्यक्रमास सगळे शिक्षकानी मंचावर उपस्थित असलेल्या स्त्री शक्तीला नमन केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ अनिता सुनील देसाई यांनी केले
0
2
5
6
2
9