ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसत्कार
माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
येवल्यातील पाणी, औद्योगिक वसाहत, गाळेधारकांचे प्रश्न मार्गी लावणार!-एकनाथ शिंदे

0
3
2
1
2
3
लक्ष्मण घुगे, राजापूर प्रतिनिधी…
आमदार दराडे बंधूंनी येवल्यातील रखडलेले प्रश्न माझ्याकडे मांडले आहे.शहराच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी थेट पाणी योजना राबविणे,औद्योगिक वसाहतीत रोजगार देण्यासाठी कंपन्या आणणे,विस्थापित गाळेधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुंबईत मुक्तागिरी या शासकीय बंगल्यावर श्री.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला,यावेळी शिंदे बोलत होते.यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे,शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते,सचिव राम रेपाळे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे तसेच माजी नगराध्यक्ष रामदास दराडे,तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच स्व. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला मान्यता दिली आहे.जनतेचा विश्वास सार्थ ठरवत सर्व पदाधिकारी काम करत आहेत. बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या या शिवसेनेत गावागावातून राज्यभरातून पदाधिकारी प्रवेश करत आहे.आम्ही दिलेला शब्द पाळतो,विचार जपतो म्हणून दराडे बंधूंनी शिवसेनेचा धनुष्यबान छातीवर लावला असल्याचे शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडीचा विधानसभेत जसा सुपडा साफ केला तसाच निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल असा विश्वास व्यक्त करत विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात राहू.लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही,शेतकरी हिताच्या सर्व योजना तसेच जनतेच्या कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे सुरू राहतील असे आश्वासन शिंदे यांनी दिले.माझ्यावर रोज आरोप होतात पण मी त्या आरोपांना उत्तर कामातून देत आलो आहे आणि यापुढेही असेच काम सुरू ठेवेल, सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार अशी ओळख आम्ही कायम ठेवू असेही शिंदे यावेळी म्हणाले.
गेल्या अडीच वर्षात अनेक शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शहराचे सुशोभीकरण, डीप क्लिन ड्राइव्ह, आरोग्य सुविधांचे बळकटीकरण आपण केले आहे. आगामी पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हीच कामे घेऊन आपल्याला लोकांपर्यंत पोहचायचे आहे. ज्याप्रमाणे लोकांनी आपल्याला विधानसभा निवडणुकीत साथ दिली तशीच भक्कम साथ ते आपल्याला निवडणुकीत देतील आणि शिवसेनेचा भगवा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर नक्की मोठ्या डौलाने फडकेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
येवला शहराला आठवड्यातून एकदा पाणी मिळत असल्याने पालखेड धरणातून पाईपलाईनने पाणीपुरवठा योजना राबवावी,खितपत पडलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावून येते कंपन्या सुरू करून भूमिपुत्रांना रोजगार द्यावा,शहरातील व्यापारी संकुलात विस्थापित गाळेधारकांना न्याय द्यावा,विंचूर चौफुलीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरणाला निधी द्यावा आदी मतदारसंघाच्या हिताच्या मागण्या यावेळी आमदार किशोर दराडे यांनी केल्या. सर्व मागण्या येवलेकर नागरिकांच्या हिताच्या असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
यावेळी माजी सभापती डॉ.सुधीर जाधव,माजी नगरसेवक दयानंद जावळे,अजय जैन,संतोष वैद्य,माजी सरपंच सयाजी गुडघे,प्रकाश वनसे,भानुदास गायकवाड,संतोष रोठे,नामदेव सोनवणे,संदीप जाधव,रवींद्रसिंह परदेशी, योगेश इप्पर,संतोष कोल्हे,पोपटआव्हाड,दत्तू वाघ,गणपत देवकर,नानासाहेब सोनवणे, मल्हारी दराडे,बाळासाहेब खानदेशी,प्रवीण लहरे,राजू पवार,अनवर शेख,नाना रोठे, बाबुराव वल्टे,राहुल भांबारे,सोमनाथ कदम, प्रशांत गोरे,नाना सोनवणे,रमेश मढवई आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दराडेंसोबत शिवसेनेत प्रवेश केला.
● आमदार दराडे यांच्यावर शिक्षक सेनेची राज्याची जबाबदारी..!
जिल्ह्यातील अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न राज्यातील महायुती सरकारने केलेला आहे.शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले असून जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी सन्मानजनक तोडगा दिला आहे. त्यामुळे शिक्षकांची साथ आणि आशीर्वाद आपल्याला नक्की मिळाले असल्याचे श्री.शिंदे यांनी जाहीर केले. यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांची याप्रसंगी शिवसेनाप्रणित शिक्षक सेनेच्या राज्य अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी श्री. दराडे शिक्षक सेनेचे राज्यात एक लाखावर सभासद बनवतील असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
0
3
2
1
2
3