
0
2
5
5
5
9
पोलीस हवालदार भास्कर रामा बस्ते 17 गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास यशस्वी
✍️ मुक्ताराम बागुल
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण आऊट पोस्ट हद्दीत असलेल्या सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरील 17 गावांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास यशस्वी झालेल्या पोलीस हवालदार भास्कर रामा बस्ते मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संदु यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रधान करून गौरविण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शासनाच्या विविध शासकीय विभागांना 100 दिवसांचा सात कलमी निश्चित करणे बाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सर्व शासकीय योजना मूलभूत सोयी सुविधा इत्यादी प्रदान करणे बाबत परिपत्रक काढले होते. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संदु (आय.पी.एस.) यांनी केलेल्या परीक्षण करून मालेगाव अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यातील हद्दीत शासनाने ठरवून दिलेल्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात एकाही गावात जातीय दंगल अथवा किरकोळ कारणावरून वाद होऊ न देता शांतता प्रस्थापित यशस्वी ठरलेल्या नांदगाव तालुक्यातील घाठ माथ्यावरील पूर्व भागात असलेल्या बोलठाण पोलीस आउट पोस्टचे पोलीस हवालदार भास्कर रामा बस्ती बक्कल नंबर 408 यांना मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संदु यांच्या हस्ते दिनांक 8 मार्च 2025 रोजी शनिवारी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पोलीस हवालदार भास्कर बस्ते यांना मार्गदर्शन देखील केले. यावेळी मनमाडचे उपविभागीय अधिकारी श्री. बाजीराव महाजन, नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, नांदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बहाकर , सुनील बडे यांच्यासह नांदगाव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0
2
5
5
5
9