आरोग्य व शिक्षणशैक्षणिक
लासलगाव महाविद्यालयात ग्राहक संरक्षण कायद्यावर व्याख्यान संपन्न

0
3
2
1
2
3
लासलगाव, – येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कंजूमर अफेअर्स कोर्स अंतर्गत ग्राहक संरक्षण कायद्यावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे तर प्रमुख वक्ते म्हणून श्री.दत्ताजी शेळके (नाशिक जिल्हा संघटक ग्राहक पंचायत महाराष्ट्र) तसेच त्यांच्या समवेत श्री.प्रकाश जोशी, डॉ.राजेंद्र बागुल, श्रीमती बागुल मॅडम, श्री.नाना शिरसाठ, श्री.वसंतराव दंडवते, श्री.अमोल लिंगायत, किरण जोशी आणि कोर्स समन्वयक श्री.सुनिल गायकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली यानंतर श्री.वसंतराव दंडवते यांनी ग्राहक गीत सादर केले. त्यानंतर डॉ.राजेंद्र बागुल, श्री.प्रकाश जोशी आणि श्री.दत्ताजी शेळके यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर मार्गदर्शन करताना ग्राहकांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या यासोबतच ग्राहक म्हणून फसवणूक झाल्यास तक्रार कशी व कुठे दाखल करावी यासंबंधी माहिती दिली. तसेच ऑनलाइन व्यवहारात फसवणूक झाल्यास तक्रार कोठे दाखल करावी तसेच जिल्हा मंच, राज्य आयोग व राष्ट्रीय आयोगाकडे आपली तक्रार दाखल केल्यानंतर आपल्याला दाद कशी मागता येते यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ.सोमनाथ आरोटे यांनी विद्यार्थ्यांना समाजात वावरत असताना जागरूक व सुजाण नागरिक म्हणून आपले वर्तन असावे असे मत व्यक्त केले. श्री.वसंतराव दंडवते यांनी सर्व विद्यार्थ्यांना ग्राहक प्रतिज्ञा दिली. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.सुनिल गायकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सुनिल गायकर यांनी परिश्रम घेतले.
0
3
2
1
2
3