Breaking
शासकीय

नाशिकमध्ये शुक्रवारी महिला सशक्तीकरण अभियान – जिल्हाधिकारी जलज शर्मा

मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाशिबिर

0 1 5 1 2 1

नाशिक, दिनांक 20 ऑगस्ट 2024 (जि. मा. का वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत शुक्रवार, दि. 23 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महाशिबिर घेण्यात येणार आहे. या महाशिबिराचे संबंधित सर्व यंत्रणांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे परस्पर समन्वयाने काटेकोरपणे यशस्वी नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दिल्या.
शासनाच्या योजनांची लाभार्थींना थेट मदत/लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या महाशिबिराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सिटी बस लिंक डेपो शेजारील मैदान, तपोवन, नाशिक येथे होणाऱ्या या महाशिबिरास जवळपास 50 हजार महिलांच्या उपस्थितीचे नियोजन करण्यात येत आहे.
महाशिबिराच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस, वाहतूक, महिला व बालविकास अशा संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन व कार्यवाही करावी. उपस्थित लाभार्थींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारावेत. तसेच, इच्छुक लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र स्टॉल उभारण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मान्यवरांची बैठकव्यवस्था, वीजपुरवठा, जनरेटर्स, महाशिबिरास येणाऱ्या महिला व अन्य लाभार्थींची वाहतूक व्यवस्था, कार्यक्रमस्थळाची स्वच्छता, स्वच्छ पेयजल, पार्किंग व्यवस्था, मोबाईल स्वच्छतागृहे, वैद्यकीय व्यवस्था, प्रथमोपचार, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहने, सूत्रसंचालन, सांस्कृतिक कार्यक्रम, एलईडी स्क्रीन्स आदिबाबत सविस्तर आढावा घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे