Breaking
ब्रेकिंग

नाशिक येथे फायनान्सच्या कथित त्रासाला कंटाळून तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

0 4 8 2 6 0

फायनान्सच्या कथित त्रासाला कंटाळून तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या; सह्याद्री रुग्णालयाबाहेर वाहन चालक युनियनची गर्दी

नाशिकच्या आडगाव हद्दीतील जत्रा हॉटेल परिसरात राहणारे महेश दादासाहेब शिंदे (वय २७) यांनी कारमध्ये विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. महेश शिंदे हे मूळ शिंगवे, ता. नांदगाव (मनमाड परिसर) येथील रहिवासी असून गेल्या आठ वर्षांपासून जत्रा हॉटेल परिसरात वास्तव्यास होते. ते ट्रॅव्हल व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, त्यांनी काही वर्षांपूर्वी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. संबंधित फायनान्स कंपनीकडून वारंवार त्रास होत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच त्यांची कारही फायनान्स कंपनीने ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. या मानसिक तणावातून त्यांनी कारमध्ये विष प्राशन केल्याचा दावा केला जात आहे.

घटनेनंतर त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर वाहन चालक युनियनचे पदाधिकारी व चालक मोठ्या संख्येने जमले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे