आरोग्य व शिक्षणशैक्षणिकसत्कार
वनसगाव विद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ

0
3
2
1
2
3
वनसगाव विद्यालयात इंटरऍक्टिव्ह पॅनल बोर्ड उद्घाटन व राणुजी कापङी यांचा सत्कार समारंभ संपन्न
निफाड, प्रतिनिधी-
वनसगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इंटरऍक्टिव्ह पॅनल बोर्ड उद्घाटन सोहळा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुजीत गुंजाळ होते.
कार्यक्रमात उत्तर विभागाच्या सल्लागार समितीवर राणुजी कापडी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यालयाचे माजी विद्यार्थी ओंकार भोसले यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल आणि एन.एम.एम.एस. परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कारही या वेळी करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य सी. डी. रोटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या सोहळ्यास विंचुर विद्यालयाचे प्राचार्य देवडे सर, जनरल बॉडी सदस्य चांदे सर, एकनाथ दादा शिंदे, अशोक डुंबरे, केशवराव जाधव, थेटाळेच्या सरपंच शितल शिंदे, सुनील शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश डुंबरे, सुनील मापारी, प्रकाश कडाळे, मुरलीधर शिंदे, रामदास शिंदे, गारे, पंढरीनाथ शिंदे, काशीनाथ डुकरे यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गायकवाड सरांनी केले, तर आभार प्रदर्शन सोनवने सरांनी व्यक्त केले. यावेळी डॉक्टर सुजीत गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त करत, विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रम अत्यंत यशस्वी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
0
3
2
1
2
3