ग्लेनमार्क फार्माकडून नाशिकमध्ये हायपरटेंशन जनजागृती रॅलींचे आयोजन
मे महिना हा ‘हायपरटेंशन जनजागृती महिना‘ म्हणून साजरा
नाशिक, १ जून २०२४ : संशोधनकेंद्रित जागतिक औषध कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (ग्लेनमार्क) मे महिना हा ‘हायपरटेंशन जनजागृती महिना‘ म्हणून साजरा केला. ग्लेनमार्कने उच्च रक्तदाबाबत (हायपरटेंशन) जनजागृ
वैद्यकीय व्यावसायिक भागीदारांच्या नेतृत्वाखालील सामान्य माहिती देणारे सत्र असे या रॅलींचे स्वरूप होते. त्यांनी उच्च रक्तदाबाशी संबंधित चिन्हे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यांबाबत सखोल माहिती दिली. याच अनुषंगाने सामान्य लोकांना आपल्या रक्तदाबाची पातळी जाणून घेण्यास मदत करण्यासाठी रक्तदाब तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्लेनमार्कने ६० लाखांपेक्षा अधिक प्रौढ व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश मिळविले. परिणामी या आजाराबाबत जागृती वाढविण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाबाबत बोलताना ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष व इंडिया फॉर्म्यूलेशन्सचे प्रमुख आलोक मलिक म्हणाले, “भारतात हायपरटेंशनच्या विरोधातील लढ्यात जनजागृती निर्माण करून एक परिणामकारक बदल घडविण्यासाठी आम्ही ठामपणे कटिबद्ध आहोत. भारतीय लोकांमध्ये, ज्यात १८ वर्षांवरील तरुणांचाही समावेश आहे, याचा प्रसार वाढत असल्यामुळे या गुप्त मारेकऱ्याबाबत (सायलेंट किलर) जनजागृती पसरविण्याला प्राधान्य देणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकांनी उच्च रक्तदाबाचे त्वरित निदान करून आपल्या आरोग्यावर नियंत्रण मिळवावे, हे आमच्या उपक्रमांचे लक्ष्य आहे कारण रक्तदाब वाढल्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. या आजाराने ग्रस्त असलेल्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपण एकत्र येऊन लक्षणीय प्रभाव आणू शकतो.”
भारतीय लोकांमध्ये उच्च रक्तदाबाबत जागरुकता वाढविण्यात आणि लवकर निदान करण्यास प्रोत्साहन देण्यात ग्लेनमार्क आघाडीवर आहे. कंपनीने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतीय प्रौढांसाठी उच्च रक्तदाबाबत जागरूकता आणि तपासणीला चालना देण्यासाठी #टेक चार्जे ऍक्ट (TakeChargeAt) १८ ही मोहीमही सुरू केली होती. ग्लेनमार्कने www.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांबाबत