
0
4
2
9
5
7
नितीन गायकवाड….
विंचूर : परिसरात बिबट्याचे ठिकठिकाणी प्रत्यक्ष दर्शन होत असल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे. कुत्रे व शेळ्यांवर हल्ल्याच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजावत नाहीत. शालेय परिसरातील मार्गावरही बिबट्या दिसल्याने मुलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीत काही व्यक्तींनी मोबाईलवर AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)च्या साह्याने विंचूर परिसरातील रस्त्यांवर बिबट्या फिरत असल्याचे बनावट फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे आधीच घाबरलेल्या नागरिकांमध्ये भीती अधिकच वाढली असून, गावात संभ्रम व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याचा प्रश्न खरा असू शकतो, मात्र एआय निर्मित फोटो पसरवून लोकांना घाबरवणे हा गुन्हाच आहे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, वनविभागाने तात्काळ पिंजरे लावावेत, तसेच नागरिकांना अधिकृत माहिती देऊन अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विंचूरसारख्या ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे जनतेच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
भ्रमणध्वनीच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता( AI) हातात आली असली तरी, ती हाताळण्यासाठी नैसर्गिक बुद्धिमत्ता वापरणे गरजेचे असल्याचे दिसून येते. एआयच्या माध्यमातून बिबट्याऐवजी चित्याचा फोटो टाकून व्हायरल करण्यात आला.काही चाणाक्ष म॔डळींच्या लक्षात हि बाब आल्याने त्यांनी इतरांना सावध केले आणि फेक फोटोचा भांडाफोड झाला.
0
4
2
9
5
7



