सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघा सगळ्यात मोठा डान्स संग्राम
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघा सगळ्यात मोठा डान्स संग्राम ‘IBD Vs SD: चॅम्पियन्स का टशन’, डान्सचा पितामह परीक्षक रेमो डिसूझासह
इंडियाज बेस्ट डान्सर आणि सुपर डान्सर हे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने विकसित केलेले डान्स रियालिटी फॉरमॅट आहेत. या दोन्ही शोजच्या घवघवीत यशानंतर आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रस्तुत करत आहे एक नवा कोरा डान्स रियालिटी फॉरमॅट ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन’. या शो मध्ये ‘इंडियाज बेस्ट डान्सर’चे कसलेले कलाकार आणि ‘सुपर डान्सर’चे छोटे उस्ताद यांच्यामध्ये डान्सच्या वर्चस्वासाठी एक जबरदस्त डान्स संग्राम होईल. 16 नोव्हेंबरपासून हा शो सुरू होत असून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 7.30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर तो प्रसारित करण्यात येणार आहे.
रियालिटी प्रकाराकडे नव्या दृष्टिकोनातून बघणारा हा शो उत्कृष्टता साध्य केलेल्या डान्सर्सची चिकाटी आणि जोश यावर प्रकाशझोत टाकून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल. यात स्पर्धकांसाठी वयाची आडकाठी असणार नाही. हा शो म्हणजे डान्सचा उत्सव असेल, यात स्पर्धक आपल्या कक्षा अधिकाधिक रुंदावून दर आठवड्याला अवाक करणारे परफॉर्मन्स देतील आणि ‘अल्टीमेट चॅम्पियन’चा किताब मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतील. या रोमांचात भर घालण्यासाठी प्रख्यात कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माता रेमो डिसूझा ‘डान्स का पितामह’ या नात्याने परीक्षकांच्या पॅनलवर असेल. त्याचे डान्स कौशल्य आणि प्रतिभा पारखणारी नजर यांचा उपयोग या नवीन पठडीच्या शो साठी होईल.
प्रोमो येथे बघा: https://www.instagram.com/p/DB_bFHhPVf2/
या अनोख्या फॉरमॅटविषयी बोलताना रेमो डिसूझा म्हणाला, “डान्स हे पहिल्यापासून माझे पॅशन आहे आणि डान्स हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. मला वाटते, डान्स हा वय, शैली आणि अनुभव यांच्या पलीकडे जातो. हेच या शो चे तत्त्व आहे. हा शो म्हणजे अत्यंत निखळ आणि दमदार स्वरूपातल्या डान्सचा उत्सव आहे. आपण यापूर्वी बघितलेल्या कोणत्याही शोपेक्षा हा शो वेगळा असणार आहे. यामध्ये दोन दमदार टीम एकत्र येणार आहेत- इंडियाज बेस्ट डान्सरचे कसलेले डान्सर आणि सुपर डान्सरचे छोटे उस्ताद! त्यांचा प्रवास आणि या मंचावर ते कसे एकमेकांना आव्हान देतात, प्रेरणा देतात आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात हे बघणे रोमांचकारक असेल.
16 नोव्हेंबरपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 7.30 वाजता बघा हा शो फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!