सत्कार
प्रीती शहाणे हीस राष्ट्रीय युवा गौरव पुरस्कार प्रदान

0
2
5
6
2
9
प्रीती शहाणे हीस राष्ट्रीय युवा गौरव पुरस्कार प्रदान
नाशिक (प्रतिनिधी) – ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती यांच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय माणुसकी सेवा पुरस्कार अंतर्गत राष्ट्रीय युवा गौरव पुरस्कार प्रीती शहाणे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.
प्रीती शहाणे एम्स येथील एम.बी.बी.एस. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी असून त्यांनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर अनेक ठिकाणी व्याख्याना द्वारे जनजागृती केलेली आहे. यासह विविध क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक कामगिरी बजावलेली आहे. तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या तेलंगणा प्रदेशाध्यक्षपदी काम केलेले आहे.
पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. साहेबराव निकम, राष्ट्रीय सचिव डॉ.अविनाश झोटिंग, राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ रोहिणी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.अर्चना झोटिंग आदीं. उपस्थित होते कु.प्रीती शहाणे च्या अनुपस्थितीत तिचे वडील डॉ.कृष्णा शहाणे यांनी स्वीकारला.
कु.प्रीती शहाणे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Sanjay Paramsagar
0
2
5
6
2
9