Breaking
ई-पेपरशासकीय

वीज क्षेत्रातील महत्त्वाचा दुवा म्हणजे “लाईनमन” – उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे

0 2 5 6 2 9

वीज क्षेत्रातील महत्त्वाचा दुवा म्हणजे “लाईनमन” – उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे

महावितरणच्या ग्राहकांना सर्वतोपरी सेवा देणारा महावितरण कंपनीचा मुख्य दुवा लाईनमन असून सोबतच जनसंपर्काचे मुख्य माध्यम सुद्धा असून, त्यांनी सुरक्षितपणे व तत्परतेने सर्वोत्कृष्ट सेवा ग्राहकांना द्यावी असे प्रतिपादन उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांनी निफाड येथे लाईनमन दिवसाच्या दिवशी केले.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतभर 04 मार्च हा लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून महावितरण निफाड उपविभाग येथे लाईनमन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
उपकार्यकारी अभियंता श्री निलेश नागरे यांनी आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निफाड उपविभागाचे फोरमन श्री सुरेश सताळे होते.तसेच प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता श्री केशवजी काळुमाळी, जनसंपर्क अधिकारी श्री विकास आढे, सहाय्यक विद्युत निरीक्षक श्रीमती विशाखा गोसावी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता श्री. थोरात, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता श्री. सुरवसे, श्री. वाणी, प्रगतशील शेतकरी तथा चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, निफाड श्री. शिवाजीराव ढेपले, पिंपरी ग्रामसेवक श्री उल्हास कोळी, शिवडी सरपंच श्री मोहन खापरे, कंत्राटदार प्रतिनिधी श्री सुनील डूबे, श्री अरविंद मोरे, श्री दीपक मोरे श्री सुनील श्रीवास्तव हे देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सेवानिवृत्त झालेले अभियंता व जनमित्र यांनी देखील कार्यक्रमाल उपस्थिती लावली, तसेच उपकार्यकारी अभियंता श्री नागरे साहेब यांचे आई वडील देखील कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते व सेल्फी पॉईंट हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी वैद्यकीय विभागाच्या डॉ. कादरी मॅडम यांनी तणावमुक्त जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सूर्या गॅस एजन्सी, नाशिक तर्फे घरगुती गॅस सिलेंडर विषयी सुरक्षा बाबत सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले.सहाय्यक विद्युत निरीक्षक नाशिक विभाग श्रीमती विशाखा गोसावी यांनी वीज यंत्रणेवर काम करताना विद्युत अपघात कसे टाळावे आणि काय काळजी घ्यावी या विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी श्री. जितेंद्र बोरसे, सहाय्यक अभियंता यांनी विद्युत सुरक्षेची सर्व जनमित्रमार्फत शपथ घेऊन विद्युत अपघात होणार नाही याची हमी घेतली. तसेच कार्यकारी अभियंता काळुमाळी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्व जनमित्रांना लाईनमन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला उपविभागातील सर्व शाखा अभियंता जनमित्र व बाह्यस्त्रोत कर्मचारी व सर्व यंत्रचालक व बिलिंग मधील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये सदर कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती छाया आहेर व श्री जितेंद्र बोरसे यांनी केले. सदर एकूण कार्यक्रम नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे साहेब व अधीक्षक अभियंता श्री ज्ञानदेव पडळकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 5 6 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे