ब्रेकिंग
किम्स मानवता हॉस्पिटल तर्फे वॉकथॉन आणि एट्रियल फिब्रिलेशन जनजागृती अभियान
0
4
2
9
5
7
नाशिक, १४ सप्टेंबर २०२५ : जागतिक हृदय दिन तसेच एट्रियल फिब्रिलेशन जनजागृती अभियानाच्या निमित्ताने किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक तर्फे आज सकाळी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर भव्य वॉकथॉन चे आयोजन करण्यात आले होते . परिसरातील नागरिक, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि विविध सामाजिक घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून निरोगी हृदय – निरोगी जीवन हा संदेश दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. निखिल पटेल , डॉ. अतुल पाटील, माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे , इंदिरानगर जॉगर्स ग्रुपचे ए व्ही कुलकर्णी , संगीतमय योगा ग्रुपचे महेश खेडकर यांच्या उपस्थितीत झाले. डॉक्टरांनी या वेळी हृदयविकार प्रतिबंधासोबतच एट्रियल फिब्रिलेशन (AFib) या आजाराविषयी विशेष मार्गदर्शन केले. AFib म्हणजे हृदयाच्या ठोक्यांचा अनियमित वेग, ज्यामुळे स्ट्रोक आणि इतर गुंतागुंतीचा धोका वाढतो. नियमित तपासणी, योग्य उपचार आणि जीवनशैलीतील सुधारणा यांमुळे या आजाराचे नियंत्रण शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

वॉकथॉनसोबतच रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात नागरिकांनी रक्तदाब, बीएमआय, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन व ईसीजी तपासण्या करून घेतल्या आणि AFib व हृदयविकार प्रतिबंधासाठी मार्गदर्शन मिळवले.
या उपक्रमात किम्स मानवता हॉस्पिटलच्या मार्केटिंग टीम, डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, ऑपरेशन व फॅसिलिटी टीम यांनी महत्त्वपूर्ण योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी केला.

“सप्टेंबर हा एट्रियल फिब्रिलेशन जनजागृती महिना असून, नागरिकांनी हृदय आरोग्याबरोबरच AFib सारख्या धोकादायक पण निदान व उपचार शक्य असलेल्या आजाराबाबत जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे,” असे किम्स मानवता हॉस्पिटलचे हृदयविकार तज्ञ यांच्या वतीने सांगण्यात आले.
किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक हे अत्याधुनिक सुविधा असलेले अग्रगण्य रुग्णालय असून विविध विभागांमधील उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, रुग्णकेंद्री आरोग्यसेवा आणि सामाजिक आरोग्य उपक्रमांसाठी ओळखले जाते.
0
4
2
9
5
7


