0
4
2
9
5
7
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते २ कोटी ४२ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
येवला – देशाच्या विकासामध्ये धार्मिक संस्थांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. धार्मिक संस्थांच्या विकासामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे या संस्थांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने येवल्यात भव्य दिव्य इस्कॉन मंदिर उभारण्यासाठी आपले प्रयत्न असून मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवला मतदारसंघात दर्जेदार विकासकामे करण्यासाठी प्राधान्य असल्याचे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी इस्कॉन मंदिर कोटमगाव व जगदंबा माता मंदिर देवस्थान कोटमगाव येथे भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी इस्कॉन मंदिरांचे महंत श्रीमान माधवकृष्ण प्रभू, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी सभापती किसनकाका धनगे, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, भागवत सोनवणे, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, गोरख सेंद्रे, नानासाहेब लहरे, संजय पगारे, संतोष गुजरे, संतोष गुजरे, संजय गुजरे, मच्छिंद्र रोकडे, सोमनाथ रोकडे, ज्ञानेश्वर रोकडे, सरपंच राजेंद्र काकळीज, अमोल सोनवणे, लता जानराव, कमळाबाई मोरे, आशाताई कोटमे, राजूसिंग परदेशी, मनोहर कोटमे, संतोष खैरनार, जगनराव जगताप, गुलाब जानराव, सोपान पवार, द्वारकानाथ कोटमे, जयवंत कोटमे, उद्धव पाटील, प्रभाकर गरुड, फकीर अहमद पठाण, विजय जेजुरकर, अकिल मुलतानी, हमीदा मुलतानी, अर्जुन ढमाले, विनोद ठोंबरे, देविदास निकम, बाळासाहेब कोटमे, गणेश कोटमे, नितीन गायकवाड, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, योगेश खैरनार, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी खासदास समीर भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवला मतदारसंघाचा कायापालट करण्यात आला आहे. विकासाची अनेक दर्जेदार कामे मतदारसंघात सुरू आहे. नाशिक येवला काँक्रीटीकरण रस्त्याचे काम सुरू असून मनमाड येवला कोपरगाव या रस्त्यांच्या कामासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. मतदारसंघात विविध संस्था विकास संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी धार्मिक संस्थांचा वाटा देखील महत्वाचा आहे. त्यांचा अधिक विकास झाला की पर्यटन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यामुळे त्यांचेही बळकटीकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते झाले या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
स्थानिक विकास निधी अंतर्गत कोटमगांव ते इस्कॉन मंदिर पर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.२५ लक्ष
कोटमगांव (विठ्ठलाचे) येथे शाळा चार वर्ग खोली बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन व दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन – ६६ लाख
कोटमगांव येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे कामाचे लोकार्पण – र.रु. ३३ लक्ष
अंदरसुल येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत संत रोहिदास मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१५ लक्ष
स्थानिक विकास निधी अंतर्गत अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभिकरण करणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१० लक्ष
संत रोहिदास महाराज मंदिर सभामंडप उद्घाटन ३० लक्ष
साईबाबा मंदिर सभामंडप उद्घाटन १५ लक्ष
बोकटे येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे कामाचे लोकार्पण – र.रु. ३३ लक्ष
देवठाण येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे कामाचे लोकार्पण – र.रु. ३३लक्ष
भारम येथे तलाठी कार्यालय बांधकाम करणे कामाचे लोकार्पण – र.रु. ३३ लक्ष
न्याहारखेडे येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत न्याहारखेडे येथे सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन – र.रु.१५ लक्ष
0
4
2
9
5
7



