बुलडाणा – जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात काही गावांमध्ये एका विचित्र आजाराच्या साथीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरल्यासचे दिसून येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा गावांमध्ये तीन दिवसांमध्ये अनेकांच्या डोक्यावरचे केस गेल्याने परीसरातील नागरिकांमध्ये या नवीन रोगामुळे दहशत निर्माण झाली. याप्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत आरोग्याचे सर्वेक्षण सुरू केले. परंतु हा नेमका काय प्रकार आहे हे अद्याप समजू शकले नाही.
50 हून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होऊन , नंतर काही दिवसात त्यांची टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत होत आहे. हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वत्र चर्चा असून, एकच खळबळ उडाली आहे. तर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळेच आता बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजाराने थैमान घातल्याचे समोर आले. गावातील कुटुंब या व्हायरसचे बळी ठरत आहेत.
* सर्वेक्षणात आढळले 30 पेक्षा जास्त बाधित :
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंड गावात सर्वेक्षण केले, त्यामध्ये केस गळतीच्या आजाराने 30 जण बाधित असल्याची माहिती आहे. याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले असून, त्यांच्याकडून रुग्णांची लक्षण आणि उपचार सुरू करण्यात येत आहे.