ब्रेकिंग
धारणगाव वीर येथे ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
4
2
9
5
7
निफाड तालुक्यातील धारणगाव वीर येथे एका इसमाने गावातील वाहणाऱ्या नदीच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बुधवार दिनांक 4 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबाबत लासलगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजू किसन शिंदे वय 30 वर्ष धंदा मजुरी राहणार धारणगाव विर तालुका निफाड जिल्हा नाशिक यांनी पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की, माझे वडील किसन आसाराम शिंदे (वय 60) राहणार धारणगाव विर, तालुका निफाड यांनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास धारणगाव वीर गावातील वाहणाऱ्या नदीच्या कडेला लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय लासलगाव येथे आणले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले आहे. याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 8/ 2026 दाखल करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांदळकर करीत आहेत.
0
4
2
9
5
7


