0
4
2
9
5
7
येवला,दि.२४ नोव्हेंबर :– ‘माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात गेल्या वीस वर्षांपासून विकासाची गंगा येवल्यामध्ये अवतरली आहे. यापुढेही येवला प्रगतीपथावर राहिल. येवला शहरवासियांना केवळ विकास हवा आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांनाच जनता निवडून देणार आहे’, असा ठाम विश्वास माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.
मेनरोड येथील सिद्धीविनायक गणेश मंदिरात नारळ वाढवून भुजबळ यांनी महायुतीचा प्रचारारंभ केला. येवला नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, रिपाइं आणि घटक पक्षातील महायुतीच्या नेत्यांनी यावेळी उपस्थिती दर्शविली. यानंतर येवला शहरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. दरम्यान, दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीचे पारडे जड झाले आहे.
गणेश मंदिरात यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, येवला विधानसभा वसंत पवार, संभाजी पवार, अरुणमामा थोरात, धनंजय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बंडू क्षीरसागर, पप्पू सस्कर, आनंद शिंदे, सुभाष पाटोळे, मीनानाथ पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, उपाध्यक्ष दत्ता निकम, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, मनोज दिवटे, राजेश भांडगे, सनी पटनी, मुश्ताक शेख, संजय बनकर, राजश्री पहिलवान, सुरेखा लोणारी, सागर लोणारी, स्वामी शिंदे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांच्यासह महायुती मित्र पक्षातील उमेदवार उपस्थित होते.
या दोन उमेदवारांची माघार
प्रभाग क्रमांक ७ मधील अपक्ष उमेदवार सुरेखा पांडुरुंग लोणारी यांनी माघार घेत महायुतीच्या उमेदवार निलांबरी कुलकर्णी यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच, प्रभाग क्रमांक ९ मधील इच्छुक उमेदवार स्वामी शिंदे यांनी माघार घेत महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २२ इच्छुक उमेदवारांनी माघार घेत पाठिंबा देऊन महायुतीचे पारडे जड केले आहे.
प्रचार फेरीने महायुतीचा जयघोष
शहरातील बुरूड गल्ली मार्गे प्रचार फेरी सुरू झाली. त्यानंतर डी जी रोड, साईबाबा मंदिर, पंडत पैठणी कॉर्नर, लक्कडकोट पैठणी, सहस्त्रार्जून मंदिर, गांधी मैदान, क्षत्रिय हॉस्पिटल, गंगा दरवाजा, पोस्ट ऑफिस, शिंपी गल्ली येथून पुढे मेनरोड, सी. डी. पटणी, बालाजी गल्ली, नपा रोड मार्गे आझाद चौक येथून टिळक मैदान येथे येऊन समाप्त झाली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, आरपीआय (आठवले गट) आणि मित्र पक्ष महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते.
0
4
2
9
5
7


