*नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आढळला ‘रोझी पिपीट’*

*नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आढळला ‘रोझी पिपीट’*
पाणथळ आणि गवताळ प्रदेशात स्थलांतर करणारे अनेक पक्षी हिवाळा संपला असताना देखील महाराष्टात दाखल होत असून नाशिक मधील रामसर दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ‘रोझी पिपीट’ हा पक्षी नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष व पक्षी अभ्यासक प्रा.आनंद बोरा व गाईड रोषण पोट यांना आढळून आला आहे.महाराष्ट्रात केवळ तो एकदाच आल्याची नोंद आहे. पूर्व हिमालय,ईशान्य भारतात आढळणारा पक्षी हिवाळ्यात उत्तराखंड दक्षिणेकडे राजस्थान आणि आसाम मध्ये जातात.महाराष्टात हा पक्षी दुर्मिळ असून तो नाशिक जिल्ह्यात आल्याने पक्षी अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण असून या परिसरात जोडीने हा पक्षी बघावयास मिळाला.रोझी पिपिट हा मोटासिलिडे कुटुंबातील पक्ष्यांची एक प्रजाती आहे. हे अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, भारत, दक्षिण कोरिया, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये आढळतात. अफगाणिस्तान आणि दक्षिण कोरियात मूळ वास्तव्य असलेल्या “रोझी पिपिट’ची वीण चीनमध्ये होते. हिवाळ्यात तो स्थलांतर करून हिमालय आणि आसाममध्ये येतो. विणीच्या काळात हा पक्षी गुलाबी दिसतो. हिवाळ्यात स्थलांतर करणारा “रोझी पिपिट’ फेब्रुवारीत परत जातो.या पक्ष्याला मराठी मध्ये अजून नाव नसल्याने त्याला गुलाबी तीरचिमणी नामकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे प्रा.बोरा यांनी सांगितले. .पिपिट या पक्ष्याच्या पन्नास पेक्षा जास्त प्रजाती असून अनेक प्रजाती स्थलांतरित आहे. कोरडे वाळवंट, वर्षावन आणि अंटार्क्टिकाची मुख्य भूमी वगळता जगातील बहुतेक भागात या पक्ष्याच्या जाती आढळतात.15 सेमीचा हा पक्षी गडद राखाडी-तपकिरी रंगामुळे सहज ओळखता येतो. पंखांची पिसे तपकिरी-राखाडी असतात. कडा पिवळसर-हिरवी असते.गळा फिकट गुलाबी असतो अल्पाइन कुरणात आणि खड्डे पसरलेल्या गवताळ उतारांवर, विशेषत: वितळलेल्या बर्फाच्या ठिपक्यांजवळ आणि दलदलीच्या किंवा पाणी साचलेल्या जमिनीवर हे पक्षी आढळून येतात.हिवाळ्यात मैदानावर लहान गवताळ प्रदेशावर, अनेकदा पाण्याजवळ, आणि पाणथळ भागात आणि भातशेतीमध्ये देखील ते बघावयास मिळतात. कीटक, बिया आणि बेरी हे त्यांचे खाद्य असून यांच्या घरट्या मध्ये घरटे कधी कधी ओरिएंटल कोकिळा अंडी टाकते. व हे पक्षी कोकिळाच्या पिल्लांना मोठे करतात.पक्षीजीव ‘एलसी’ वर संरक्षण स्थिती किमान चिंता असल्याचे सांगितले गेले आहे.
🎯 *हिवाळा संपल्या नंतर अनेक परदेशी पाहुणे परतीच्या प्रवासाला निघतात.त्यामध्ये अनेक पक्षी आफ्रिकेतून युरोप कडे निघतात तर काही हिमालयाकडे निघतात.पण असे काही पक्षी आहेत कि ते महाराष्टात येत नाही.पण गेल्या तीन वर्ष पासून निसर्गातातील बदलामुळे अनेक पक्षी प्रथमच येत आहे.यासाठी आम्ही तीन महिन्यांपासून पक्षी सर्व्हे करीत असून अनेक पक्षी अभयारण्यात बघावयास मिळत आहे.पूर्व हिमालय,ईशान्य भारतात आढळणारा रोझी पिपीट’ प्रथमच आम्हाला अभयारण्यामध्ये बघावयास मिळाला आहे*
*प्रा.आनंद बोरा,पक्षी अभ्यासक*