महिरावणी येथे मातोश्री गी.दे. पाटील विद्यालयामध्ये पर्यावरण दिन उत्साहात साजरा
वन विभाग व विद्यालय संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण लागवड
नाशिक : प्रतिनिधी
महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयामध्ये हरित सेना अंतर्गत पाच जून जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम विद्यालय व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सरपंच कचरू वागळे,संस्थेचे उपाध्यक्ष संतू पाटील,मुख्याध्यापक अशोक भदाणे,सामाजिक वनीकरण विभागाच्या सुनीता देशमुख, महेंद्र निकुंभ, उपसरपंच सोमनाथ खांडबहाले, ग्रा.सदस्य दिपक वाघ,पोलीस पाटील सौ. दिपाली कैलास खांडबहाले, भाऊसाहेब खांडबहाले, नाशिक कृ.उ.बा.समिती उपसभापती उत्तम खांडबहाले, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर खांडबहाले आदी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या सुनीता देशमुख यांनी आपल्या मनोगतात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. आज तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड व कमी झालेली वृक्ष लागवड, त्यामुळे वृक्ष संवर्धन करून निसर्गाचा समतोल राखणे काळाची गरज आहे असे सांगितले. यावेळी विद्यालयात प्रमुख पाहुणे तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते वड, आवळा, मिलो, फायकस, निंब, पिंपळ, शिसव इत्यादी प्रकारची झाडे लावण्यात आली. त्या झाडांची निगा ठेवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापका अशोक भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले. याप्रसंगी अँड.माधवराव खांडबहाले,बाळासाहेब चव्हाण, दत्तात्रय मते, महिरू मते, दत्तात्रेय आहेर, गोरख खांडबहाले, नवनाथ साळवे, अरुण मते, कैलास खांडबहाले, ज्ञानेश्वर मेढे, समाधान पगार उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे, संजय गायकवाड,सुरेखा भामरे, अश्विनी चौरे, दिपाली वाडीले, खंडू लांबे, दिलीप खांडबहाले, विलास येवले आदींसह महिला पालक तसेच पालक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार देवेंद्र देवरे यांनी मानले.