Breaking
ई-पेपरनिवडनोकरीराजकियसत्कारसामाजिक

देवगाव गटाच्या अध्यक्षपदी प्रमोद तुपे यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी गणेश वैद्य

श्रीक्षेत्र खेडले झुंगे संतवन येथे नाभिक महामंडळाची बैठक संपन्न

0 4 2 9 5 7

शरद लोहकरे, लासलगाव…

निफाड तालुका नाभिक महामंडळाची देवगाव गटातील बांधवाची बैठक खेडले- झुंगे (संतवन) येथे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ,तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश वाघ,तालुका उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, देवगाव गट प्रमुख प्रमोद तुपे
यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
बैठकीत दाढी-कटींगच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येवून सलुन व्यवसाय दरवाढ,गट संघटन, सलुन व्यवसायीकांच्या इतर समस्या यांसह अनेक विषयांवर चर्चा होऊन एक मताने निर्णय घेण्यात आले. सलूनसाठी वापरण्यात येणारे साहित्य, कॉस्मेटिक, वीजदरात प्रचंड वाढ झालेली आहे. तसेच, गेल्या काही वर्षांपासून सलून व्यावसायिकांनी दरात वाढ केलेली नव्हती.
मात्र वाढती महागाईमुळे संघटनेने दाढी-कटींगसह विविध प्रकारच्या सलूनच्या दरात वाढ करण्याचा निर्णय संघटनेचे नाभिक महामंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक दत्ताशेठ अनारसे,
प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सलुन दरवाढीचा निर्णय घेण्यात घेतला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, तालुकाध्यक्ष डाॅ. प्रकाश वाघ, प्रमोद तुपे, प्रमोद सोनवणे, वैभव वैद्य, गणेश वैद्य,अक्षय वैद्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी देवगाव गटाच्या अध्यक्षपदी प्रमोद तुपे यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी गणेश वैद्य यांची निवड करण्यात आली. यावेळी अभिजित जगताप, शशिकांत महाले,वैभव वैद्य,संदिप वाघ,अक्षय वैद्य,पिंटू बनभेरु,गणेश वैद्य रामकृष्ण कणसे कृष्णा कणसे ,
अरून कणसे ,शंकर वैद्य ,अक्षय वैद्य, मनोज अनारसे, भास्कर शिंदे,शांताराम बनभेरू, नंदकीशोर बनभेरु, बन्सी बनभेरू, निलेश शिंदे, शामराव वैद्य,गोरख वैद्य, नवनाथ वैद्य, सोमनाथ वैद्य, निलेश कणसे, हरिहर वैद्य, सोपान कणसे, गोपाळ कणसे, कैलास कणसे, नारायण कणसे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे