१६ फेब्रुवारीला नाशिकमध्ये रंगणार ‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ कार्यक्रम

‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम १६ फेब्रुवारी २०२५ रोजी नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे पार पडणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अव्वल ठरली आहे. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम नाशिकमध्ये राबवण्यात येणार आहे. ‘मेळा मनोरंजनाचा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार असून नाशिक मधील प्रेक्षकांना खास सरप्राईज असणार आहे. आता सरप्राईज काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहली आहे. कार्यक्रमात अभिनेत्री मीरा जग्गनाथची दिलखेचक अदा, नृत्यांगणा धनश्री दळवी व वैष्णवी पाटील यांच्या बहारदार लावणीने कार्यक्रमात आणखी धमाल येणार आहे.
‘मेळा मनोरंजनाचा’ या कार्यक्रमात संगीत, नृत्य, असा मनोरंजनाचा नजराणा असणारच आहे. पण याचबरोबर ‘सन मराठी’च्या कलाकारांना भेटण्याची संधी तसेच त्यांच्या बरोबर धमाल गप्पा, सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन इथेच थांबणार नाही तर गायक जसराज जोशी, गायिका आनंदी जोशी, अक्षता सावंत या कलाकारांच्या बहारदार गाण्याने कार्यक्रमाला रंगात येणार आहे. तसेच ‘जुळली गाठ गं’ या नव्या मालिकेतील धैर्य-सावी या जोडीचा रोमँटिक डान्स पाहायला मिळणार आहे. नुकतंच ‘सन मराठी’वर ‘सखा माझा पांडुरंग’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला या मालिकेतील कलाकार ही कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.
आपल्या नाशिक शहरात ‘सन मराठी’ प्रस्तुत ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम येत्या १६ फेब्रुवारी २०२५ रोजी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, नाशिक येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तर या मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी शुल्क आकारण्यात आलेल नसून प्रेक्षकांसाठी प्रवेश विनामूल्य असेल. त्याचबरोबर प्रवेशाधिकार राखीव असून प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. तुम्ही या बातमीचा फोटो काढूनही पास म्हणून वापरू शकता. चला तर मग मंडळी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि १६ फेब्रुवारीची संध्याकाळ खास बनवा.