Breaking
शैक्षणिक

महिरावणी येथे मातोश्री पाटील विद्यालयामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

0 3 2 1 2 3

नाशिक:प्रतिनिधी
महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयात देशात सामाजिक क्रांतीचे पर्व सुरू करणारे लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची १५० वी जयंती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक भदाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थी कुमार तुषार अशोक खेटरे या विद्यार्थ्याने भाषण केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी ओळखून गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले असे सांगितले यावेळी विद्यालयातील उपशिक्षक बाळासाहेब कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करत सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका सुरेखा भामरे यांनी केले.यावेळी देवेंद्र देवरे, संजय गायकवाड, अश्विनी चौरे, दिपाली वाडीले,खंडू लांबे, दिलीप खांडबहाले, विलास येवले यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार सामाजिक शास्त्रे विषयाचे प्रमुख,ज्येष्ठ शिक्षक संजय पवार यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे