क. भा. पा. विद्यालयात “गुरुपौर्णिमा” मोठ्या उत्साहात साजरी.
जीवनात यशस्वी होण्यासाठी एक तरी गुरू असावा - प्राचार्य एन ई देवढे
जीवनात यशस्वी होण्यासाठी एक तरी गुरू असावा – प्राचार्य एन ई देवढे
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अभिवादन केले व आपल्या भाषणा मध्ये गुरु विषयीचे महत्व सांगितले. आपल्या शिक्षकांविषयीची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य एन ई देवढे यांनी व्यक्तिला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जीवनात गुरुचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी गुरु असावा असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे भावगीता मधून गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून दिले.
हा कार्यक्रम इयत्ता दहावी ब च्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या घडवून आणला. यावेळी विद्यालयातील सानिका क्षीरसागर, आरती गलांडे, अर्विना शहा, सिद्धांत राऊत, गायत्री मुद्गुल, प्रतीक्षा गाढवे, पद्मनाभ आभाळे या विद्यार्थ्यांनी भाषणातून आपले गुरु विषयीचे मत व गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. त्याचप्रमाणे विद्यालयातील उपशिक्षिका सौ कुलकर्णी व श्रीमती सावळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गुरुपौर्णिमेचे महत्त्व विविध ऐतिहासिक दाखले देत पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा यथोचित सत्कार करून आपली गुरु विषयीची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम बुचकुले व श्रावणी थोरात यांनी केले तर अमन सय्यद याने उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक के जी जोपळे, रयत शिक्षण संस्था सातारा चे लाईफ मेंबर आर के चांदे, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.