Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगसामाजिक

‘आरपार’ १२ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

0 4 2 9 5 7

प्रेमात वेडे असाल तर ‘आरपार’ला नक्की जाल, १२ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ललित-ऋताची लव्हेबल केमिस्ट्री आरपार चित्रपटातून मोठ्या पडद्यावर, १२ स्पटेंबरपासून चित्रपटगृहात

सध्या सर्वत्र एका मराठी चित्रपटाच्या टिझर, पोस्टर आणि गाण्यांनी हवा केलेली पाहायला मिळतेय. या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं चित्रपटातून समोर आले तेव्हापासून साऱ्यांमध्येच उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री ऋता दुर्गुळे यांचा ‘आरपार’ हा सिनेमा येत्या १२ सप्टेंबर पासून सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली. शिवाय ललित आणि ऋताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे आणि या चाहत्या वर्गाला या दोन्ही कलाकारांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’ हे सांगणारा हा रोमँटिक चित्रपट येत्या १२ सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ललित आणि ऋतासह चित्रपटात कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेते माधव अभ्यंकर, सुहिता हट्टे, स्नेहलता वसईकर, वीणा नायर, जान्हवी सावंत ही कलाकार मंडळीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. याचबरोबर चित्रपटाची खास बाब म्हणजे चित्रपटातील गाणी. रोमँटिक गाण्यांसह चित्रपटातील जागरण गोंधळने तर साऱ्यांच लक्ष वेधलं. चित्रपटातील काही गाणी थिरकायला भाग पाडण्यास लावत आहेत यांत शंकाच नाही. चित्रपटात ललित- ऋता यांच्यातील प्रेम आणि दुरावा याचे समीकरण पाहायला मिळणार आहेत.

‘लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी’ प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर, रितेश चौधरी निर्मित ‘आरपार’ हा सिनेमा आहे. त्तर अभिनेता ललित प्रभाकरने या चित्रपटाची सहनिर्माता ही भूमिका सांभाळली. अभिनयाबरोबर आता ललितने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा ऋता व ललित या नव्या जोडीसह १२ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे