आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पेर-ओरल एंडोस्कोपिक मायोटॉमी POEM शस्त्रक्रिया यशस्वी
0
4
2
9
5
7
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये पेर-ओरल एंडोस्कोपिक मायोटॉमी POEM शस्त्रक्रिया यशस्वी
नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने उत्तर महाराष्ट्रात POEM (Per Oral Endoscopic Myotomy) शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून एक नवा इतिहास रचला आहे. हा क्षण केवळ अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलसाठीच नव्हे, तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरला आहे.
जळगाव येथील ३४ वर्षीय तरुण दीर्घकाळापासून गिळताना त्रास होणे, अन्न अन्ननलिकेत अडकणे, वारंवार उलट्या होणे, छातीत वेदना व जळजळ होणे अशी तीव्र लक्षणे जाणवत होती. अशा प्रकारच्या आजारामुळे रुग्णांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण बनते. ते नाशिक येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तपासणीनंतर त्यांना Achalasia Cardia असल्याचे निदान झाले, जे अन्ननलिकेच्या स्नायूंच्या आकुंचनामुळे होते.
हॉस्पिटलच्या मेडिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजी तज्ज्ञ टीम —डॉ. सोहम दोशी,डॉ. संदीप पाटील, डॉ. अमोल शिंदे, आणि डॉ. दीपक गुप्ता — यांनी आधुनिक एंडोस्कोपिक पद्धतीने POEM शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. संपूर्ण प्रक्रिया कमी वेदना (Minimally Invasive) बाहेरून टाके न टाकता पार पडली. रुग्णाची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर झपाट्याने सुधारली आणि काही दिवसांतच त्यांना सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला.
रुग्णाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले,
“माझ्या आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून जे त्रास सुरू होते ते इतके वाढले होते की साधं अन्न खाणंही अवघड झालं होतं. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये मला योग्य निदान आणि उत्तम उपचार मिळाले. शस्त्रक्रियेनंतर मला खूप हलकं वाटतंय, मी आता सहजपणे अन्न खाऊ शकतो. मला पुन्हा एकदा नवं जीवन मिळाल्यासारखं वाटतंय. या संपूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानतो.”
POEM ही एक अत्यंत प्रगत एंडोस्कोपिक पद्धत आहे ज्यामध्ये शरीरात मोठी चीरा घेण्याची गरज नसते. यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात, लवकर बरे होते आणि दैनंदिन जीवनात लवकर परतता येते. अशा शस्त्रक्रियांचे यशस्वीरीत्या उत्तर महाराष्ट्रात होणे हे रुग्णांसाठी मोठे वरदान आहे.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असून येथे जागतिक दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे. येथील मेडिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजी विभाग अत्यंत आधुनिक आणि कौशल्यपूर्ण असून अलीकडेच हा विभाग मेडिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजीसाठी शैक्षणिक केंद्र म्हणून कार्यरत झाला आहे. अशा यशस्वी POEM शस्त्रक्रियेमुळे नाशिक आणि परिसरातील रुग्णांना मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरात न जाता उपचार घेण्याची सुविधा मिळत आहे.
ही कामगिरी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलसाठी अभिमानाची बाब आहे आणि अशा यशस्वी उपचारामुळे उत्तर महाराष्ट्रातील लोकांना जागतिक दर्जाची आरोग्यसेवा त्यांच्या शहरातच मिळण्याचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
0
4
2
9
5
7



