Breaking
ब्रेकिंग

‘इंडियन सिल्क हाऊस एजन्सीज’चे महाराष्ट्रात दिमाखदार पदार्पण; नाशिकमध्ये भव्य स्टोअरचे उद्घाटन करत राष्ट्रीय विस्ताराला दिली बळकटी!

0 4 6 1 9 7

इंडियन सिल्क हाऊस एजन्सीज’चे महाराष्ट्रात दिमाखदार पदार्पण; नाशिकमध्ये भव्य स्टोअरचे उद्घाटन करत राष्ट्रीय विस्ताराला दिली बळकटी!

राज्यातील या पहिल्या भव्य दालनामध्ये, ब्रँडने आपली जगप्रसिद्ध ‘सारीज ऑफ इंडिया’ शृंखला प्रस्तुत केली आहे

नाशिक: गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून पूर्व भारतातील सर्वात विश्वसनीय साडी ब्रँड असलेल्या ‘इंडियन सिल्क हाऊस एजन्सीज’ने महाराष्ट्रातील आपले पहिले भव्य दालन नाशिकमध्ये सुरू केले आहे. राज्यातील हे पहिले आणि देशभरातील ६५वे स्टोअर असून, ब्रँडच्या राष्ट्रीय विस्ताराच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारीगरी आणि अस्सलतेचा समृद्ध वारसा जपत, इंडियन सिल्क हाऊस एजन्सीज आता नाशिकमध्ये आपली सुप्रसिद्ध ‘सारीज ऑफ इंडिया’ शृंखला सादर करत आहे. यामध्ये देशभरातील ६० पेक्षा अधिक विणकाम केंद्रांमधील १५,००० हून अधिक कारागिरांच्या उत्कृष्ट कलाकुसरीचे दर्शन घडणार आहे.

महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वाचा सण ‘गुढीपाडवा’ जवळ येत आहे. या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून नाशिकमधील नवीन दालनामध्ये विशेष ‘गुढीपाडवा एडिट’ सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये सणासुदीसाठी खास निवडक सिल्क साड्यांचा समावेश करण्यात आला आहे. या दालनात बंगालच्या क्लासिक साड्या जसे की कांथा, बालूचरी, मटका, टसर आणि कॉटन साड्यांसह दक्षिण भारताचे विशेष आकर्षण असलेल्या कांजीवरम, कांचीपुरम आणि आरणी सिल्कच्या एकापेक्षा एक सरस साड्या उपलब्ध आहेत. ब्रँडचे ‘हेरिटेज कलेक्शन’ देशभरातील प्रतिष्ठित विणकाम कलांना एकाच छताखाली आणते, ज्यात बनारसी, कतान बनारसी, हैदराबादी कतान, इकत, बंधेज, पैठणी, गढवाल आणि उप्पडा अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. दैनंदिन साधेपणापासून ते सण आणि विशेष सोहळ्यांपर्यंत, सिल्क साड्यांचे अगणित पर्याय येथे मिळतील. या भव्य शुभारंभाचा आनंद ग्राहकांसोबत वाटून द्विगुणित करण्यासाठी, ‘इंडियन सिल्क हाऊस एजन्सीज’ २० मार्च २०२६ पर्यंत मर्यादित काळासाठी सर्व कलेक्शनवर सरसकट १०% सवलत देत आहे.

या प्रसंगी ‘इंडियन सिल्क हाऊस एजन्सीज’चे सीईओ श्री. दर्शन दुधोरिया म्हणाले, “नाशिक हे आमच्यासाठी महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे—एक असे राज्य ज्याचे विविध वस्त्रे आणि पारंपारिक विणकाम कलेशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि अतूट नाते आहे. या प्रदेशातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आणि तीर्थक्षेत्र म्हणून नाशिक आपली समृद्ध वारसा परंपरा, व्यापार आणि पारंपारिक हस्तकलेप्रती असलेल्या आदरासाठी ओळखले जाते. या विस्तारासह, राज्यातील ग्राहकांसाठी ‘सारीज ऑफ इंडिया’ सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या दालनाच्या माध्यमातून देशभरातील विणकाम केंद्रांमधून अस्सल हातमाग साड्या थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. यासोबतच भारताच्या वैभवशाली वस्त्र परंपरेचा सन्मान करणे आणि ही परंपरा जिवंत ठेवणाऱ्या कारागीर समुदायांना पाठबळ देणे, हे आमचे ध्येय आहे.”

आज ‘इंडियन सिल्क हाऊस एजन्सीज’ १५ राज्यांमध्ये ६५ दालनांच्या माध्यमातून एक भक्कम आणि विस्तारत असलेल्या राष्ट्रीय रिटेल नेटवर्कसह कार्यरत आहे. टियर १ ते ४ पर्यंतच्या शहरांमध्ये आपली व्याप्ती वाढवण्यात आणि आपल्या डी2सी वेबसाइटद्वारे (indiansilkhouseagencies.com) ओम्नी-चॅनेल नेटवर्क अधिक सक्षम करण्यात ब्रँडने लक्षणीय प्रगती केली आहे. नाशिकमधील हे नवीन दालन केवळ महाराष्ट्रातील प्रवेशाचे प्रतीक नसून, नवीन प्रदेशांत अस्सल भारतीय हातमाग पोहोचवण्याच्या ब्रँडच्या वचनबद्धतेची साक्ष देते. त्याचबरोबर, दीर्घकालीन भागीदारी आणि जबाबदार रिटेलच्या माध्यमातून कारागीर समुदायांना निरंतर पाठबळ देणे हे आमचे ध्येय आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे