Breaking
ब्रेकिंग

निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे दोन गटात राडा

गोळीबार केल्याचा आरोप, सात जण अटकेत

0 4 7 4 6 2

अवैध दारू विक्रीच्या वादातून पिस्तूलातून गोळीबार केल्याचा आरोप; कोकणगाव येथे दोन गटात तुफान राडा ; पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल ; सात आरोपी अटकेत

किरण कुमार आवारे…

शिरवाडे वाकद:- निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे अवैध दारू विक्रीला विरोध केल्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या मारामारी आणि भांडणाच्या परस्पर तक्रारीवरून पिंपळगाव पोलीस स्टेशनला दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले असून सात

आरोपींना अटक केली आहे.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सुधाकर केदारे (वय ३१, रा. सत्यवती नगर, कोकणगाव, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २९ मे रोजी सायंकाळी त्यांनी अकिल पटेल यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कोकणगाव परिसरात अवैध दारूचा पुरवठा करू नये, असे सांगितले होते. त्यानंतर विशाल केदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरसगाव येथे जाऊन अकिल पटेल यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यात वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानंतर रात्री सुमारे ९.२० वाजेच्या सुमारास घागरनाला परिसरातील पार्थ बिअर शॉपीजवळ विशाल केदारे व त्यांचे सहकारी उभे असताना दानिष ऊर्फ मुज्जु सर्फराज शेख, अल्तमश सर्फराज शेख, जहिर पठाण, अरमान ऊर्फ कोहली पटेल, वसिम (पूर्ण नाव माहित नाही) तसेच अन्य दोन ते तीन जण चारचाकी वाहनातून तेथे आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, यावेळी दानिष ऊर्फ मुज्जु शेख याने जातीवाचक शिवीगाळ करत पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली व गोळीबार केला. सदर गोळी फिर्यादीच्या पायाजवळ जमिनीवर लागल्याने तेथून पळ काढून त्यांनी पोलिस ठाणे गाठले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अकिल पटेल यांच्या सांगण्यावरूनच हा गोळीबार करण्यात आल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला असून संबंधित सर्व संशयितांविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील आरोपी अकिल पठाण, जाहिर पठाण, वसिम रा.पिंपळगाव ताब्यात असुन बाकी आरोपींचा शोध सुरू आहे.

         दरम्यान अकिल पटेल यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली असून या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसगाव येथील पटेल मोटर्सचे मालक अकिल अमिर पटेल हे पत्नीसमवेत मुलीला भेटण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे गेले होते. रात्री सुमारे ८.४५ वाजता दुकानातील कर्मचारी अनिल कमळाकर कडाळे यांनी फोन करून काही जण दुकानावर आल्याची माहिती दिली.

तक्रारीनुसार, कोकणगाव येथील विशाल केदारे, कार्तिक पठाडे, बादशहा पठाडे, शिंदे, बाज्या, संकेत व त्यांच्या सोबत इतर काही जण तीन ते चार दुचाकींवरून दुकानावर आले. त्यांनी दुकानासमोरील १५ ते २० दुचाकी आणि ११ चारचाकी वाहनांची तोडफोड केली. तसेच दुकानातील दोन टीव्ही आणि पाण्याचा फिल्टरही फोडला.

यावेळी दुकानातील कर्मचारी अनिल कडाळे यांना बादशहा पठाडे यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा, तर शरद नंदू जाधव यांना विशाल केदारे यांनी लोखंडी गजाने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी दुकानातील गल्ल्यातील सुमारे २३ हजार रुपये रोख रक्कम घेऊन गेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून त्यांचा डीव्हीआरही चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील आरोपी विशाल केदारे, बादशाह पठाडे, कार्तिक पठाडे, अमोल तिडके रा.पिंपळगाव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 4 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे