Breaking
आरोग्य व शिक्षणसामाजिक

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच एअरलिफ्टेड लिव्हर ट्रान्सप्लांट आणि ७ दिवसात रुग्णाला डिस्चार्ज

0 4 2 9 5 7

40 दिवसात तीन यशस्वी लिव्हर ट्रान्सप्लांट अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचा नवा विक्रम* उत्तर महाराष्ट्रात प्रथमच एअरलिफ्टेड लिव्हर ट्रान्सप्लांट *आणि ७ दिवसात रुग्णाला डिस्चार्ज

उत्तर महाराष्ट्रात प्रथमच, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे मानवी यकृताची हवाई मार्गाने यशस्वी वाहतूक करून यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. वेळेवर नियोजन आणि अचूक समन्वयामुळे ही ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली. सांगली ते कोल्हापूर दरम्यान ग्रीन कॉरिडॉर, तर कोल्हापूर ते नाशिक कार्गो एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अवघ्या दोन तासांत यकृताची सुरक्षित व जलद वाहतूक करण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेमुळे एका गंभीर रुग्णाच्या जीवनात नव्याने आशेचा किरण निर्माण झाला.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील यांच्या देखरेखीखाली उपचार घेत असलेल्या, यकृत सिरोसिस व यकृताच्या कर्करोगाने त्रस्त दोंडाईचा, जि. धुळे, येथील ५१ वर्षीय पुरुष रुग्णावर यशस्वी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेत करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला नवीन जीवन मिळाले असून अवघ्या सात दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

ही ऐतिहासिक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया डॉ. शरणकुमार नरुटे आणि त्यांच्या तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या पार पाडली. या संपूर्ण प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, सांगली येथील ब्रेन डेड रुग्णाचे यकृत काढण्याची शस्त्रक्रिया डॉ. अमोल जाधव(ट्रान्सप्लांट सर्जन) यांनी यशस्वीरीत्या पार पाडली, ज्यामुळे पुढील प्रत्यारोपण प्रक्रिया वेळेत शक्य झाली.

या प्रक्रियेत अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. संदीप सबनीस (सीनिअर जनरल सर्जन), डॉ. सोहम दोषी (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट), डॉ. अमोल शिंदे (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट) आणि डॉ. संदीप भंगाळे (भूलतज्ञ) यांनी परस्पर समन्वय साधत ही जटिल वैद्यकीय प्रक्रिया यशस्वी केली.

यावेळी प्रतिक्रिया देताना गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील म्हणाले,
“यकृत सिरोसिस व यकृताच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये योग्य वेळी योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. अवयवाची वेळेत उपलब्धता, अचूक नियोजन आणि संपूर्ण वैद्यकीय टीममधील उत्कृष्ट समन्वयामुळे हे यश शक्य झाले. अवघ्या सात दिवसांत रुग्ण बरा होऊन घरी परतणे ही आमच्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे.”

तसेच या शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे डॉ. शरणकुमार नरुटे म्हणाले,
“एअरलिफ्टेड अवयव वाहतूक आणि त्यानंतरचे यकृत प्रत्यारोपण ही प्रक्रिया वैद्यकीय दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते. मात्र शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडता आली. उत्तर महाराष्ट्रात अशा उच्चस्तरीय प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणे ही आरोग्यसेवेतील मोठी झेप आहे.”

यावेळी प्रसंगी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले,
“ही ऐतिहासिक कामगिरी केवळ नाशिकच्या वैद्यकीय क्षमतेचे दर्शन घडविणारी नाही, तर रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांच्या मनात नव्याने विश्वास आणि आशा निर्माण करणारी आहे. जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक उपचारपद्धती आता नाशिकमध्येच उपलब्ध असल्याचे हे ठोस उदाहरण आहे.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे