Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्र

संधिवात: सांध्यांची झीज टाळण्यासाठी सजग राहा!

— डॉ. राहुल रामचंद्र सुपे, अस्थिरोग तज्ज्ञ, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक.

0 4 2 9 5 7

संधिवात: सांध्यांची झीज टाळण्यासाठी सजग राहा!

— डॉ. राहुल रामचंद्र सुपे, अस्थिरोग तज्ज्ञ, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक.

सांधेदुखी किंवा सांध्यांना सूज येणे याला वैद्यकीय भाषेत आर्थरायटीस तर सामान्य भाषेत संधिवात असे म्हणतात. हा आजार विशेषतः वृद्धांमध्ये दिसून येतो, मात्र अलीकडे तरुणांमध्येही याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

आर्थरायटीसमध्ये नेमकं काय घडतं?
सांध्यांमधील सायनोवियल फ्लुइड नावाचा एक तेलकट द्रव आणि कार्टिलेज हा संरक्षक थर यामुळे सांध्यांची हालचाल सुरळीत होते.
परंतु संधिवातामध्ये या द्रवाचे प्रमाण कमी होते, कार्टिलेजची झीज होते आणि हाडं एकमेकांवर घासू लागतात. यामुळे वेदना, सूज आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो.

संधिवाताची लक्षणं:
सततची सांधेदुखी, सकाळी उठल्यानंतर जाणवणारी ताठरता, सांध्यांमध्ये सूज, लालसरपणा, चालण्यामध्ये अडचण.
संधिवाताचे प्रकार:
१. रूमेटॉईड आर्थरायटीस:
कोणत्याही वयोगटात होणारा प्रकार. बोटं, हात व गुडघ्यांमध्ये त्रास होतो. सकाळी उठल्यानंतर ताठरता जाणवते.
२. ऑस्टेओआर्थरायटीस:
वयाच्या ५० नंतर होणारा प्रकार. हाडांची झीज झाल्यामुळे मुख्यतः गुडघ्यांमध्ये त्रास होतो.
३. गाऊट (Gout):
मांसाहार, मद्यपान व प्रोटीनयुक्त आहारामुळे युरिक ॲसिड वाढते, ज्यामुळे अचानक सांधेदुखी होऊ शकते.
४. अंकिलोसिंग स्पॉन्डिलोसिस:
तरुणांमध्ये दिसणारा प्रकार. पाठ व मणक्यांमध्ये ताठरता व दुखापत होते.

उपचारपद्धती:
संधिवात हा टप्प्याटप्प्याने वाढणारा आजार आहे. प्राथमिक टप्प्यांमध्ये औषधे, फिजिओथेरपी आणि जीवनशैलीत बदल करून नियंत्रण शक्य आहे. परंतु शेवटच्या टप्प्यात संधेरोपण शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय ठरतो. सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गुडघा व खुब्याच्या संधेरोपण शस्त्रक्रिया अत्यंत अचूक आणि यशस्वी होत आहेत. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर १२ ते २४ तासांत वॉकरच्या मदतीने चालू शकतात. ४ ते ८ आठवड्यांत पूर्वीप्रमाणे सामान्य हालचाल शक्य होते.

काय काळजी घ्यावी?
अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियमित व योग्य व्यायाम करावा. रोज वॉक व स्ट्रेचिंगचा सराव करावा. सांध्यांची झीज टाळण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवावे.

डॉ. राहुल रामचंद्र सुपे (MBBS, MS (Ortho), DNB, FIJR) हे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असून संधिवात, सांधेरोपण व अस्थिरोग क्षेत्रातील त्यांच्या कौशल्यामुळे अनेक रुग्णांना पुन्हा चालण्याची व नव्याने जगण्याची संधी मिळाली आहे.
अशोका मेडिकव्हर रुग्णालय, नाशिक येथे रोबोटिक गुडघा प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध आहे. आणि
आपल्या सांध्यांचे आरोग्य जपा – वेळेवर निदान व उपचाराने संधिवातावर मात करता येते.

1/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे